महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
नवी मुंबईतील मानाच्या पालखीचे कार्ला गडी प्रस्थान
नवी मुंबई : एकवीरा आईचा उदो उदो,आय माऊलीचा उदो उदोचा जयघोष करीत नवी नवी मुबंईतील मानाची अशी ख्याती प्राप्त झालेल्या आई एकविरा देवीच्या पालखीने रविवारी लोणावळा येथील कार्ला गडाकडे प्रस्थान केले.यावेळी नवी मुंबईतील हजारो एकवीरा देवी भक्तांनी पालखी दर्शनास हजेरी लावली.
गावदेवी युवा मित्रमंडळ जुईनगर संस्थापक, अध्यक्ष शैलेश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे या वर्षीही जुईनगर ते श्री क्षेत्र आई एकविरा देवी मंदिर,कार्ला डोंगर असा पदयात्रा सोहळा आयोजित केला आहे . रविवार दिनांक ७ जानेवारी सकाळी ९ वाजता गावदेवी मंदिरात आरती केल्यानंतर गावाला प्रदक्षिणा घालून पालखी कार्ला गडी रवाना झाली. नवी मुंबईची मानाची पालखी अशी ख्याती असलेल्या या पालखीचे हे बारावे वर्ष असून या पालखी सोहळ्यात नवी मुंबईतील १००० च्यावर तरुण अधिकृत नोंदणी करून मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने सहभागी झाले होते. तर जवळपास ६० च्या वर ब्रास बँड पथकांनी पालखीसाठी सेवा दिली.यावेळी माजी आमदार संदीप नाईक व युवा नेते वैभव नाईक यांनी पालखीला खांदा दिला.तसेच मुंबईतील अनेक लोकप्रतिनिधींसह हजारो नागरिकांनी हजेरी लावली. मंगळवार दिनांक ९ जावेवारी रोजी पालखी कार्ला गडी पोहोचणार असून आई एकविरा मंदीरा जवळ पालखी नाचवण्यात येईल.