महापालिका आयुक्तांकडून ‘ठाणे'मधील नालेसफाईची पाहणी

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईची कामे वेगाने सुरु आहेत. सदर कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार  पाहणी दरम्यान महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला.

२८ मे रोजी झालेल्या या पाहणी दौऱ्यात आयुवत राव यांनी सर्वप्रथम आनंदनगर येथील नालेसफाईचे काम पाहिले. या नाल्याचा काही भाग मुंबई महापालिका हद्दीत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेशी समन्वय साधून येथील सफाईचे काम होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यांनतर रेल्वे मार्गाखालून जाणाऱ्या, ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या मागे असलेल्या नाल्याची सफाईचे काम आयुक्तांनी पाहिले. या नाल्यातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला आहे. रेल्वे मार्गाखाली असलेल्या भागातून सफाई करणे आव्हानात्मक असले तरी ते काम व्यवस्थित केले जावे, अशी सूचना यावेळी आयुक्त राव यांनी दिली.

वर्तकनगर येथील दोस्ती शेजारील नाला, महात्मा फुले नगर येथील नाला आणि कोरम मॉल लगतचा नाला यांची पाहणी आयुक्त राव यांनी केली. कोरम मॉल लगतच्या नाल्याची मोठा भाग पूर्व द्रुतगती महामार्ग येथे जोडला जातो, तेथेही व्यवस्थित सफाई केली जाईल याची दक्षता घेण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

सदर पाहणीवेळी आयुवतांसमवेत अतिरिवत आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) तुषार पवार, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, आदि अधिकारी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मालमत्ता धारकांना व्याज, शास्ती विना देयके देण्याची मागणी