ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘ठाणे'ला लागलेला गद्दारीचा कलंक पुसायचाय!
ठाणे: ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचारे या सच्चा शिवसैनिकाला मतदारांनी साद दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्याची हीच वेळ असून ‘ठाणे'ला लागलेला गद्दारीचा कलंक आपल्याला पुसायचा आहे, अशी साद घालत विचार यांनी आज जोरदार प्रचार केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या १० वर्षात केलेली कामे, युध्दपातळीवर सुरु असलेले प्रकल्प त्याचबरोबर भविष्यात नव्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण कटीबध्द असल्याचा विश्वास विचारे यांनी मतदारांना दिला आहे. खा. राजन विचारे यांना जागोजागी प्रतिसाद देत नागरिकांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी ‘शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे'चे जिल्हाप्रमुख केदार दिघे, प्रवक्ता अनिश गाढवे, संपर्कप्रमुख सुभाष म्हसकर, उप जिल्हाप्रमुख सुनील पाटील, राजेंद्र महाडिक, समन्वयक संजय तरे, सह समन्वयक राम काळे, विभाग प्रमुख वासुदेव भोईर, अरविंद भोईर, साईनाथ पाटील, मयूर पैलकर, प्रतिक राणे, जिवाजी कदम, पप्पू आठवाल, युवासेना अधिकारी किरण जाधव, राज वर्मा, महिला उपविभाग संघटक राजेश्री सुर्वे, सुनंदा देशपांडे, वैशाली शिंदे, आरती खळे, पुजा भोसले, विद्या कदम, ज्योती दुग्गल, उषा बोरुडे, गीता चव्हाण, कविता नार्वेकर, ‘काँग्रेस'चे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, ‘राष्ट्रवादी'अध्यक्ष सुहास देसाई, ‘राष्ट्रवादी युवक काँग्रेस'चे विक्रम खामकर, ‘काँग्रेस'चे महेश म्हात्रे, ‘आप'च्या सलुजा, ‘संभाजी ब्रिगेड'चे चंद्रशेखर पवार तसेच ‘महाविकास आघाडी'चे पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, राजन विचारे यांच्या प्रचार यात्रेला ७ मे रोजी सकाळी घोडबंदर येथील हायलँड पार्क ढोकाळी येथून सुरुवात झाली. रुणवाल सिटी येथून पुढे बाळकुम नाका, दादलानी पार्क, बाळकुम पाडा, लोढा कॉम्प्लेक्स, माजिवडा गाव, ऋतू पार्क, आनंद पार्क, श्रीरंग सोसायटी, वृंदावन सोसायटी, रुस्तमजी, पंचगंगा, राबोडी, मीनाताई ठाकरे चौक, गोकुळ नगर गोल्डन डाईज, नारळीपाडा, रुणवाल नगर, कोलवाड, जागमाता मंदिर,कोलबाड, प्रताप सिनेमा, खोपट, गोकुळदास, सिद्धेश्वर तलाव, टेंभी नाका, सिव्हील हॉस्पिटल, उथळसर, सेंट्रल मैदान पोलीस लाईन, धर्मवीर शक्तीस्थळ, खारकर आळी, सिडको, स्टेडियम, ठाणा कॉलेज, खारटन रोड, तलावपाळी सिग्नल, काँग्रेस कार्यालय अशी प्रचाराची रॅली निघाली.
भाषणात वायफळ बडबड -विचारे
‘महाविकास आघाडी'च्या प्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून त्यांना चांगलाच घाम फुटलेला असल्याचा टोला राजन विचारे यांनी लगावला आहे. मुळात लोकसभा निवडणुकीत देशहिताचे, राष्ट्रहिताचे, राज्याच्या दृष्टीकोनातून विकासाचे मुद्दे मुख्यमंत्र्यांनी बोलायला हवेत. मात्र, त्यांचा अभ्यास कमी असल्याने भाषणात वायफळ बडबड करुन जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरू असल्याचा आरोप राजन विचारे यांनी यावेळी केला.