गोठीवलीच्या नमुंमपा शाळेला विज्ञान एकांकिका स्पर्धेत पारितोषिक

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका केंद्राच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालय रबाळे येथे अन्वय प्रतिष्ठानच्या सहकार्याने ग्रंथाली-प्रतिभांगण विज्ञानधारा आयोजित विज्ञान एकांकिका स्पर्धा २६ आणि २७ फेब्रुवारी रोजी पार पडली. मुंबई केंद्रात १९ शाळांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यात प्रथम पारितोषिक : शाळा क्र. ४६ गोठिवली, द्वितीय पारितोषिक : शाळा क्रमांक ५५ कातकरी पाडा, तृतीय पारितोषिकः शाळा क्रमांक ११६  सानपाडा तर उत्तेजनार्थ १ : शाळा क्रमांक १५ शिरवणे, उत्तेजनार्थ  २ : शाळा क्रमांक ११८ यांनी पटकावले.

 २८ फेब्रुवारी रोजी या स्पर्धांच्या इतर सहा केंद्रातून प्रथम आलेल्या एकांकिकांची अंतिम स्पर्धा पार पडली. यात आदर्श विद्यानिकेतन मिरा रोड यांनी प्रथम पारितोषिक तर राजीव गांधी विद्यालय नालासोपारा यांनी द्वितीय पारितोषिक पटकावले. पारितोषिक वितरण माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या हस्ते झाले. शिक्षणातून विकास आणि समृद्धी हे ब्रीद घेऊन ही शाळा पुढे जात आहे. आज हे शैक्षणिक केंद्र एक संस्कार केंद्र म्हणून ओळखले जाते. विज्ञानाचा प्रसार छोट्या छोट्या रील्स मधून अधिक प्रमाणात करता येईल असे  सुधाकर सोनवणे यांनी सांगितले. ग्रंथाली आयोजित विज्ञान एकांकिका स्पर्धेच्या पारितोषिक समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले सूचित केले. ग्रंथाली प्रकाशनला पुढील वर्षी ५० वर्षे होत आहेत त्या निमित्ताने ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर यांनी पुढील वर्षीच्या महत्त्वकांक्षी योजना मांडल्या. याप्रसंगी भाभा अणुशक्ती केंद्राचे वैज्ञानिक डॉ शरद काळे यांनी विज्ञान प्रसारावर आपले विचार मांडले. डॉ अजित मगदूम, डॉ नंदिनी थत्ते, डॉ सुधीर थत्ते, महापालिकेच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सुलभा बालघरे आदींनीही आपले मनोगते यावेळी मांडले. अभिनेते मनीष सोपारकर आणि डॉ. शुभम पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या उपक्रमास मुख्याध्यापिका रंजना वनशा यांचे सहकार्य लाभले. ग्रंथालीच्या अश्विनी भोईर, तसेच नारायण लांडगे पाटील यांनी कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

श्री दत्त मंदिर विद्यालयचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात