उरण तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान

उरण : मावळ-लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उरण तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ‘उरण'चे आमदार महेश बालदी आणि ‘काँग्रेस'चे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदार संघात एकूण ३३ उमेदवार निवडणुकीच्या प्रक्रियेला सामोरे जात आहेत. मात्र, खरी लढत ‘शिवसेना-भाजपा महायुती'चे उमेदवार श्रीरंग बारणे विरोधात ‘शिवसेना (उबाठा)-राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट)-काँग्रेस-शेकाप महाआघाडी'चे उमेदवार संजोग वाघेरे-पाटील यांच्यात आहे. त्यामुळे देशात मोदींचे हात बळकट करण्यासाठी ‘भाजपा'ने ‘मावळ'ची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.

‘उरण'चे आमदार महेश बालदी यांनी १३ मे रोजी मतदानाच्या दिवशी सकाळी उरण शहरातील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. ‘काँग्रेस'चे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. ‘महाराष्ट्र राज्य खलाशी संघ'चे राज्य अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावूला. एकंदरीत उरण तालुक्यातील मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 खारघर मध्ये अनेक मतदारांच्या नावावर डिलीट शिक्का