भूमिपुत्रांसाठी लढणाऱ्या नेत्याला भूमिपुत्ररत्न पुरस्कार प्रदान !

उरण : विद्यार्थी दशेपासून नेहमीच समाजबांधवांसाठी लढणारे, १९८४ सालच्या भूमिपुत्रांच्या गौरवशाली - शौर्यशाली लढ्यात अगदी तरुण वयात सहभाग घेऊन तेव्हापासुन ते आजपर्यंत स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांसाठी लढणारे कामगार नेते महेंद्र घरत यांना कोकण दर्पण राज्यस्तरीय भूमिपुत्ररत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले. दि.बा.पाटील साहेबांचे कार्य पुढे नेत स्थानिक प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यात महेंद्र घरत अग्रेसर असतात. विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांप्रमाणे  न्हावा - शिवडी सागरी सेतू (MTHL)  तसेच उरण -नेरूळ रेल्वेमार्ग बाधित प्रकल्पग्रस्तांना साडेबावीस टक्के विकसित भूखंड तसेच एकरी ९ कोटी येवढा मोबदला देण्यात महेंद्रशेठ घरत यशस्वी झाले. सिडको प्रकल्पग्रस्त गावांसाठी खेळाचे मैदान,मंदिरांना १ कोटी अनुदान, गावागावात जलकुंभ, अंतर्गत रस्ते, शेकडो तरुणांना रोजगार मिळवून देवून भूमीपुत्रांसाठी तन - मन - धनाने काम करणारे रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांच्या कार्याची दखल घेवून कोकण दर्पणच्या राज्यस्तरीय भूमिपुत्ररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सोहळा नेरूळ येथील आगरी कोळी सांस्कृतिक भवन येथे पार पडला. या सोहळ्या प्रसंगी माजी मंत्री गणेश नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार बाळाराम पाटील, प्रितम म्हात्रे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.  भूमिपुत्रांसाठी सदैव लढण्याऱ्या महेंद्रशेठ घरत यांना भूमिपुत्ररत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणजे पाणथळ क्षेत्र वादावर उच्च न्यायालयाचा आदेश