थकीत कर भरुन जप्ती कारवाई टाळा; महापालिकेचे आवाहन

पनवेल : पनवेल महापालिका कर संकलन- कर आकारणी विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता कर वसुलीची मोहीम अधिक तीव्र केली असून, वसुली पथकांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. आता दैनंदिन ९ वसुली पथकांच्या बरोबरीने  निवासी थकबाकीदारांकडून वसुली करण्यासाठी ६ वसुली पथकांची  वाढ करण्यात आली आहे. परिणामी, नागरिकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढू लागला असून चौथ्या दिवशी १ कोटीहून अधिक कराचा भरणा महापालिकेच्या तिजोरीत झाला आहे.

९ पथकांच्या माध्यमातून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील थकीत मालमत्ता करदात्यांना ४०० हून अधिक जप्ती नोटिसांचे वाटप करण्यात आले आहे. वसुली पथकांच्या माध्यमातून मोहीम तीव्र करण्यात आली आहे. दरम्यान, मालमत्ता धारकांचा मालमत्ता कर भरण्याकडे ओढा वाढू लागला आहे. नुकत्याच झालेल्या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीला महापालिकेला कोणतीही स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरुन सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

वसुली पथकांच्या माध्यमातून कळंबोली मधील स्टील मार्केट, मार्बल मार्केट, कामोठो तील विविध सोसायटी, जवाहर औद्योगिक वसाहत, रोहिंजण, तळोजा, खारघर, नवीन पनवेल अशा सर्व ठिकाणच्या थकबाकीदारांना भेटी देण्यात येत आहेत. जप्ती कारवाई टाळण्यासाठी मालमत्ता कर भरण्याचे आवाहन वसुली पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. येत्या काही दिवसांमध्ये सदरची कारवाई अधिक कडक केली जाणार असल्याचे आयुवत गणेश देशमुख यांनी सांगितले.
 

वसुली माध्यमातून महापालिकेच्या विविध भागांमध्ये जप्ती नोटिसांचे वाटप, थकबाकीदारांना मालमत्ता कर लवकर भरण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. निवासी, औद्योगिक आणि व्यावसायिक थकबाकीदारांनी थकीत मालमत्ता कर भरुन जप्ती कारवाई टाळावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
-गणेश देशमुख, आयुवत-पनवेल महापालिका. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

वाजले निवडणुकीचे बिगुल; लोकसभा निवडणुकीची घोषणा