पर्यावरण सेवा योजनेंतर्गत महापालिकांच्या चार शाळांमध्ये व्याख्यानाचे आयोजन

पनवेल : माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन व संरक्षण याचे महत्व शालेय ,स्तरावर बाल वयात विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीद्वारे बिंबवण्यासाठी  शासन निर्णयाद्वारे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये "पर्यावरण सेवा योजना" पनवेल महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत उपायुक्त डॉ.वैभव विधाते यांच्या मार्गदर्शनाखालीआज महापालिकेंच्या लोकनेते दि.बा पाटील विद्यालय, गुजराती शाळा, हुतात्मा हिरवे गुरूजी जीवन शिक्षण विद्यामंदिर,उर्दू शाळा याठिकाणी पर्यावरण विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.

माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पर्यावरणाचे महत्व शालेय विद्यार्थ्यांना समजावे यासाठी "पर्यावरण सेवा योजना" महापालिकेच्यावतीने पालिका कार्यक्षेत्रातील 25 माध्यमिक विद्यालयांमध्ये राबविण्यात येत आहे. या पर्यावरण सेवा योजनांतर्गत आकाश, जल, वायू, भूमी, अग्नि या माझी वसुंधरा अभियानातील महत्वाच्या घटकांनूसार कृती कार्यक्रम, शिबिरे, व्याख्याने, वक्तृत्व स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, वृक्षारोपण, प्रश्नमंजूषांचे आयोजन विद्यालयांमध्ये करण्यात येत आहेत.

आज लोकनेते दि.बा पाटील विद्यालय, गुजराती शाळा, हुतात्मा हिरवे गुरूजी जीवन शिक्षण विद्यामंदिर,उर्दू शाळांमधील विद्यार्थ्यांना पर्यावरण सेवा योजनेची माहिती  देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी झाडे दत्तक घेऊन त्यांना वाढविण्याविषयी सांगण्यात आले. तसेच ‘जल’ या विषयावरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाण्याचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. याबरोबरच पर्यावरण संवर्धनावर आधारित व्हिडीओ विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. यावेळी  चारही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

आर टी ई  अंतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळेवर कारवाईची मागणी