म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
सी-लिंक बाधित १३२ मच्छीमार बांधवांना एक रवकमी नुकसान भरपाई
८२ जणांना लवकरच पुढील हप्त्याचे वाटप; कागदपत्रांची पूर्तता करुन उर्वरित मच्छीमारांनाही नुकसान भरपाई
नवी मुंबई ः ‘एमएमआरडीए'तर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईमधील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, घणसोली, ऐरोली येथील मच्छीमार बांधवांना ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भरपाई मिळाली आहे. त्याअनुषंगाने आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांची प्रकल्पबाधित मच्छीमार बांधवांसोबत आग्रोळी येथे बैठक झाली.
यासंदर्भात ‘एमएमआरडीए'ने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली येथील एकूण १३२ मच्छीमार बांधवांना आणि ज्या ८२ मच्छीमार बांधवांना पहिला हप्ता प्राप्त झाला आहे, त्यांनाही दुसरा हप्ता आणि तिसरा हप्ता अशी सर्वांना एक रवकमी नुकसान भरपाई डी.बी.टी. द्वारे संबंधितांच्या थेट बँक खात्यात जमा झाली आहे, असे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
तसेच उर्वरित ज्या मच्छीमार बांधवांची कागदपत्रांच्या अभावी नुकसान भरपाई मिळण्याची प्रक्रिया अपूर्ण आहे ती लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी करुन पूर्ण व्ोÀली जाणार आहे. माझा कोणताही कोळी बांधव या नुकसान भरपाई पासून वंचित राहणार नाही, असे आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.
आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या निवासस्थानी झालेल्या सदर बैठकीप्रसंगी ‘भाजपा'चे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, ‘डोलकर मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष पांडुरंग कोळी, ‘खांदेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष निळकंठ कोळी, ‘फगेवाले मच्छीमार संस्था'चे अध्यक्ष अनंता बोस यांच्यासह इतर कोळी बांधव आणि महिला उपस्थित होत्या.
न्हावाशेवा शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली ४ वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करीत आहे. नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, घणसोली, ऐरोली गांव येथील कोळी बांधव मासेमारी करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. या माझ्या मच्छीमार कोळी बांधवांना संकटातून बाहेर काढणे एक लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे. तसेच काही मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई मिळाली असून त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
-आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.