केबीपी कॉलेजला ‘नॅक'तर्फे ए प्लस प्लस ग्रेड

विद्यार्थ्यांचे अभिनंदन

नवी मुंबई : ‘रयत शिक्षण संस्था'च्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील
कॉलेजला राष्ट्रीय मुल्यांकन-मान्यता परिषद (नॅक) यांच्याकडून चौथ्या
टप्प्यात ीं++ ग्रेड बहाल करण्यात आले आहे. २३ आणि २४ एप्रिल २०२४ रोजी
‘नॅक'च्या तीन सदस्यीय ‘समिती'ने महाविद्यालयाची तपासणी केली होती. या
‘समिती'मध्ये कुलगुरु प्रो. डॉ.कुलदीप शर्मा (चेअरमन), प्रो.पुष्पेंद्र
सिंग (समन्वयक) आणि प्राचार्य डॉ. रामचंद्र राव यांचा समावेश होता.

सदर ‘समिती'ने महाविद्यालयातील पायाभूत सुविधा, संशोधन, अध्यापन,
अध्ययन-मुल्यमापन प्रक्रिया, अभ्यासक्रम, महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि
विद्यार्थांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या बेस्ट
प्रॅक्टीसेस या निकषांच्या आधारावर तटस्थपणे मुल्यमापन केले. ‘नॅक
समिती'ने कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजला सर्वोत्तम मानांकन या प्रकारातील
ए प्लस प्लस ग्रेड (स्कोअर-३.५१) बहाल केले.

सदर सर्वोच्च मानांकनामुळे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक
यांनी आनंद व्यक्त करत महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर
कर्मचारी तसेच माजी विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमाचे आणि योगदानाचे
कौतुक केले.

दरम्यान, महाविद्यालयास उत्कृष्ट ग्रेड मिळाल्याबद्दल ‘रयत शिक्षण
संस्था'चे चेअरमन चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर,
‘रयत'चे संघटक डॉ. अनिल पाटील सचिव विकास देशमुख, सहसचिव
प्रिं.डॉ.ज्ञानदेव म्हस्के, ‘महाविद्यालय विकास समिती'चे सर्व सदस्य
यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शुभदा नायक आणि त्यांच्या सर्व
सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 पनवेल महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश