मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
विठू नामाच्या गजराने दुमदुमला कोपरी परिसर
कोपरी गाव ग्रामस्थांतर्फे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन
नवी मुंबई : "विठोबा रखुमाई" , "ज्ञानोबा माऊली तुमाराम" च्या गजराने कोपरी गाव परिसर दणाणून गेला होता व साक्षात पंढरपूरची वारी रविवारी ग्रामस्थांनी अनुभवली गुरुवर्य ह.भ.प.आदीतवार महाराज म्हात्रे यांच्या प्रेरणेने कोपरी गावात मागील २५ वर्षांपासून सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात आहे.
कोपरी गाव ग्रामस्थांतर्फे या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण दिनांक १ जानेवारी ते ८ जानेवारी २०२४ दरम्यान आयोजन केले होते .या पार्श्वभूमीवर एकादशी निमित्त रविवारी गावात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली होती.आणि या दिंडीला पंचक्रोशीतील नागरिकांनी उस्फुर्त पणे सहभाग नोंदविला. दिंडीत लहान मुलांपासून ते अगदी जेष्ठ नागरिकांनी भाग घेतला होता.सर्वजण वारकरी वेशात आले होते.लहान मुलींनी तर चक्क नववारी चा साज चढवत तुळसी डोक्यावर घेतल्या होत्या.तसेच दिंडीत फुगड्या खेळण्यात आल्या व उभे रिंगण पण सजविले होते.त्यामुळे गावात आषाढी कार्तिकी एकादशी प्रमाणे साक्षात आळंदी,पंढरपूर च्या.वरीचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला. आज काल्याच्या किर्तनाने या सप्ताहाची सांगता होणार आहे.
सप्ताहात माहेरवासिनिंचा सन्मान
आगरी कोळी समाज हा मातृसत्ताक समाज मानला जातो.त्यामुळे या समाजात आजही महिलांना मान सन्मान दिला जातो. मुलीचे लग्न झाले की ती सासरावसिन होते.मात्र आगरी कोळी समाजात गावातील सण उत्सव, गौरी गणपती असो की घरातील लग्न कार्य या साऱ्या कार्यात माहेरवासिनिंना बोलावून त्यांचा सन्मान राखला जातो.आणि ही सन्मानाची असलेली घट्ट नाळ कोपरी गावातील ग्रामस्थांनी अखंड हरिनाम सप्ताहात अधिक घट्ट केली आहे. यावेळी गावातील माहेर वासिंनिंना आमंत्रित करून त्यांच्या हस्ते ग्रंथ राज ज्ञानेश्वरीचे पूजन करण्यात आले. तसेच माहेर वासिन व जावई असा दोघांचा ग्रामस्थांतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.
खेळाडूंनी दिली दिंडीला मानवंदना
गावातील अखंड हरिनाम सप्ताह मुळे एकादशी निमित्त रविवारी गावात दिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली होती.आणि याच दरम्यान गावदेवी मैदानात कोपरी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.याच वेळी दिंडी मैदानाच्या प्रवेशद्वारा जवळ आली असता सुरू असलेली स्पर्धा थांबवून सर्व खेळाडूंनी दिंडीच्या दोन्ही बाजूला उभे विठूनामाचा जयघोष करत अनोखी मानवंदना दिली.