कोपरखैरणे येथे राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धेला प्रारंभ

नवी मुंबईत इंडोनेशियन युध्दकला पिंंच्याक सिलॅटची राज्यस्तरीय स्पर्धा

नवी मुंबई : १३ व्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट स्पर्धा २०२३-२४ ला ८ जुलै रोजी कोपरखैरणे येथील ख्राईस्ट अकादमी स्कूलच्या पटांगणावर प्रारंभ करण्यात आला. ८ व ९ जुलै रोजी पार पडणाऱ्या या स्पर्धेत राज्यभरातील २१ जिल्ह्याच्या संघांमधील २१५  स्पर्धकांनी सहभाग दर्शवला आहे. सदर स्पर्धेच्या उद्‌घाटनाचा नारळ दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांनी वाढवला. यावेळी शिवप्रतिमेचे पूजन करुन साई होली फेथ स्कूल कोपरखैरणेच्या मॅनेजिंग डायरेवटर सौ साधना सिंह आणि प्राचार्या सौ. स्मिता शर्मा यांनीही उपस्थिती दर्शवून स्पर्धकांचे मनोबल वाढवले.

याप्रसंगी बोलताना ‘इंडियन पिंच्याक सिलॅट असोसिएशन'चे राष्ट्रीय अध्यक्ष किशोर येवले यांनी स्पर्धेच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना नवी मुंबईत या खेळासाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याची खंत व्यवत केली. हरयाणामधील कोणत्याही स्पर्धकाने या स्पर्धेत विजेतेपद मिळवले तर तीन लाखाचे इनाम मिळते; मात्र महाराष्ट्रात मात्र विजयी खेळाडूला तीन रुपयेही दिले जात नाही असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र पिंच्याक सिलॅट असोसिएशन अनेक वर्षे सातत्याने स्पर्धांमधून विजेते ठरत असल्याचा अभिमानही त्यांनी व्यवत केला. नवे राज्य सरकार या खेळासाठी सहाय्यभूत ठरेल यासाठी आपण आपल्या सहकाऱ्यांसमवेत पाठपुरावा करीत असल्याचेही येवले यांनी यानिमित्त सांगितले. सदर प्रसंगी राजेंद्र  घरत यांनी या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन नवी मुंबईत होत असल्याबद्दल आनंद व्यवत केला व स्वच्छ आणि सुनियोजित शहर या पाठोपाठ नवी मुंबई हे पराक्रमी क्रीडापटूंचे शहर म्हणूनही नावारुपाला यावे असे आपल्या भाषणात सांगितले. सध्या अवतीभवती महिलांविषयक गुन्हेगारीत प्रचंड वाढ झाल्याने महिलांची सुरक्षितता धोवयात आल्याचे दिसते, अशावेळी पिंच्याक सिलॅट ही इंडोनेशियन युध्दकला मुलींसाठी मोठी उपयुवत ठरणारी असून ही कला शिकलेल्या प्रत्येक मुलीने अन्य शंभर मुली-महिलांना ही युध्दकला शिकवावी असे आवाहन करुन घरत यांनी या स्पर्धेत दाखल झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या व चांगल्या आयोजनाबद्दल आयोजकांची प्रशंसा केली. साई होली फेथ स्कूलच्या मॅनेजिंग डायरेवटर सौ.साधना सिंह यांनीही किशोर येवले यांच्या आयोजनाचे कौतुक केले आणि इतवया मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद हा आश्वासक असल्याचे सांगितले. सदर उद्‌घाटन सोहळ्यास साहेबराव ओहोळ, पौणिमा तेली, संकेत धामंडे, तृप्ती बनसोडे, अरविंद शिर्के, सुर्यकांत कचरे, मिथुन जोशी, विवेक सिंग, डॉ. संकेत पाटील, आनंदराव कचरे, अनुज सरनाईक, मुकेश सोनावणे, सौ, सुरेखा येवले आदि उपस्थित होते. 

 

Read Previous

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न

Read Next

नवी मुंबईकर विशेष खेळाडू तनया पाताडे हिचे विशेष ऑलिम्पिक स्पर्धेत दैदिप्यमान यश