वर्तकनगर शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ

ठाणे : ठाण्यातील वर्तकनगर शिक्षण मंडळाला यंदा पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल संस्थेचा सुवर्ण महोत्सवी वर्षाचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. शाळेचे माजी विद्यार्थी आणि आजी-माजी शिक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शाळेचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शाळेच्या जुन्या आठवणींनी माजी विध्यार्थी आणि शिक्षक गहिवरले असल्याचे भावूक क्षण पाहायला मिळाले. दरम्यान, या सुवर्ण महोत्सवी दिनाच्या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेने केली.

१९७३ पासून वर्तकनगर मधील कामगार वस्तीतील मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने काही शिक्षणप्रेमी मंडळींनी एकत्रित येऊन वर्तक नगर शिक्षण मंडळाची स्थापना केली. दोन खोल्यांनी सुरु झालेल्या वर्तकनगर शिक्षण मंडळाचे आज आर.बी.अंकोला प्राथमिक शाळा, श्रीमती सावित्रीदेवी थिराणी विद्यामंदिर ( मराठी विभाग), श्री सुशील कुमार थिराणी ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, व्ही. एन. एस इंग्रजी माध्यम आणि बीएसएफ डिग्री कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स अशा भव्य वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांचे आणि आजी-माजी शिक्षकांचे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले. या स्नेहसंमेलनात १९८०  पासून २०२२ पर्यंतच्या सुमारे ५ हजारापेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित झाले होते. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. वर्तक नगर शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष यांनी मंडळाच्या स्थापनेच्या वेळी आलेल्या अडचणींची आठवण करून देत आज मंडळाची प्रगती बघून समाधान व्यक्त केले. हा कार्यक्रम सावित्रीदेवी थिराणी विद्या मंदिराच्या प्रांगणात अतिशय उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे कार्याध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून मंडळाच्या पन्नास वर्षाचा लेखजोखा मांडला. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून जितेंद्र पाटील अपर परिवहन आयुक्त आणि सतिश सहस्रबुद्धे सेवानिवृत्त अपर परिवहन आयुक्त, देविदास जोशी, संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र आयरे, मुख्य चिटणीस संजय राव, कोषाध्यक्ष उदय भागवत, सहचिटणीस गिरीश पाटील, संजय राऊत, मुख्याध्यापक जालिंदर माने, पुष्पा शेंडे, मृणाल आंब्रे, तृप्ती कवळे, मनोहर पाटकर, संगीता चुघसह सर्व आजी माजी सदस्य, संचालक आणि माजी शिक्षक मोठया उपस्थित होते.

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

टेम्स टेक्नॉलॉजी व ब्रेन गेम्स