गुटख्याच्या पुडीमुळे मुकबधीर मुलाच्या हत्येचा छडा
नवी मुंबई ः तळोजा येथील १२ वर्षीय मुकबधीर मुलावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याचे हातपाय बांधून त्याचा मृतदेह तळ्यात टाकून देणारा नराधम आरोपी गुटखा खाऊन टाकून देण्यात आलेल्या पुडीमुळे पोलिसांच्या हाती लागला आहे. रमजान मोहम्मद शेख (२१) असे नराधमाचे नाव असून गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने त्याच्या मुसवया आवळून त्याला डायघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. सदर गुन्ह्यात आरोपी बाबत कुठल्याही प्रकारचा पुरावा नसताना गुन्हे शाखेने गुटखा खाऊन टाकण्यात आलेल्या पुडीवरुन आरोपीचा माग काढून त्याला पकडण्याची कामगिरी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
या घटनेतील मृत १२ वर्षीय मुकबधिर मुलगा दहिसर भागात राहण्यास होता. तर आरोपी रमजान मोहम्मद शेख देखील त्याच भागात राहण्यास होता. २५ मार्च रोजी या घटनेतील मृत मुलाचा मृतदेह तळोजा हद्दीतील तळ्यामध्ये आढळून आला होता. सदर मुलगा हातपाय बांधलेल्या स्थितीत आढळून आल्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे आणि मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांनी घटनास्थळी पथकासह भेट दिली. यावेळी पोलिसांना घटनास्थळापासून ५० मीटर अंतरावर मृत मुलाची पॅन्ट आणि त्याच्याजवळ गुटखा खाऊन टावूÀन देण्यात आलेली पुडी आढळून आली होती. गुन्हे शाखेने घटनास्थळावरील पुरावे ताब्यात घ्ोऊन आरोपींचा शोध घ्ोण्यासाठी २ पथके तयार केली.
त्यानंतर पोलिसांनी मिळालेली माहिती आणि तांत्रिक तपासावरुन ८ संशयित व्यक्तींना ताब्यात घ्ोतले. पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल तपास केला असता त्यापैकी दहिसर ठावूÀरपाडा येथे राहणारा रमजान मोहम्मद शेख गुटखा खात असल्याचे तसेच घटनास्थळावर सापडलेली गुटख्याची पुडी त्यानेच खाऊन टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेने रमजान मोहम्मद शेख याच्याकडे तळ्यामध्ये सापडलेल्या मुलाच्या मृतदेहाबाबत सखोल तपास केला असता त्याने शारीरिक सुखाकरिता सदर मुलाचे अपहरण करुन त्याच्यावर लैंगिक अत्याचार व्ोÀले. तसेच आपले बिंग फुटेल या भितीने या मुलाची हत्या करुन त्याचा मृतदेह तळ्यात टाकल्याची कबुली दिली. त्यानंतर गुन्हे शाखेने आरोपी रमजान शेख याला पुढील कारवाईसाठी डायघर पोलिसांच्या स्वाधीन केले.