दिवाळे गावातील ज्येष्ठांना नवीन वर्षाची भेट

स्मार्ट व्हिलेज अंतर्गत विरंगुळा केंद्राचे उद्‌घाटन

नवी मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण देशातील गावांचे ‘स्मार्ट व्हिलेज'चे स्वप्न तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील गाव दत्तक योजनेच्या अंतर्गत ‘बेलापूर'च्या आमदार सौ.मंदाताई म्हात्रे यांनी नवी मुंबईतील दिवाळे गाव दत्तक घेतले आहे. नवी मुंबईतील पहिले स्मार्ट व्हिलेज म्हणून ‘दिवाळे गांव'चा विकास सुरु आहे. याअंतर्गत आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधी मधून दिवाळे गावातील जेष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र बांधण्यात आले असून त्याचे उद्‌घाटन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते नववर्ष प्रारंभदिनी करण्यात आले.

गांव दत्तक योजना अंतर्गत स्मार्ट व्हिलेज म्हणून दिवाळे गाव स्मार्ट व्हावे म्हणून आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सकल्प हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने स्थानिक आमदार विकास निधीमधून २५ कोटी रुपयांचा निधी त्याकरिता उपलब्ध ला आहे. त्यातून दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिकांकरिता उभे राहिलेल्या सभागृहाचे (विरंगुळा केंद्र) महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते लोकार्पण करण्यात आल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.

विरंगुळा केंद्राच्या परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी ओपन जिम निर्माण करण्यात आली असून या ओपन जिमच्या माध्यमातून ज्येष्ठांना सकाळी व्यायाम करता यावे, त्यांचे आरोग्य निरोगी ठेवता येईल या दृष्टीकोनातून सर्व सुविधायुक्त अशा विरंगुळा केंद्राची निर्मिती केली आहे. तसेच या वर्षाचा नवीन संकल्प म्हणून बेलापूर मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाकरिता वर्षभर विविध उपक्रम राबविणार असल्याचेही आमदार सौ. मंदाताई म्हात्रे म्हणाल्या.

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून दिवाळे गाव स्मार्ट व्हिलेज करण्याच्या दृष्टीने अथक प्रयत्न सुरु आहेत. मागील काही महिन्यामध्ये दिवाळे गावात बॅन्ड प्रशिक्षण केंद्राकरिता समाज मंदिर, गजेबो, सुसज्ज मासळी-भाजी मार्केट  अशा अनेक विकास कामांचा उद्‌घाटनाचा धडाका त्यांनी दिवाळे गावात लावलेला आहे. आता नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी दिवाळे गावातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आमदार निधीच्या माध्यमातून सुंदर अशी वास्तू विरंगुळा केंद्राचा लोकार्पण सोहळा साजरा झाला, याबद्दल महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याबद्दल गौरवोद्‌गार काढले.

याप्रसंगी माजी नगरसेविका भारती कोळी, महापालिका उपायुक्त सोमनाथ पोटरेे, डॉ. श्रीराम पवार, शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे, संजीव पाटील, उप-कार्यकारी अभियंता अजय पाटील, विकास सोरटे, निलेश पाटील, जी. एल.करणानी, ‘ज्येष्ठ विरंगुळा केंद्र'चे अध्यक्ष चंद्रकांत कोळी, सचिव गंगेश कोळी, खजिनदार एकनाथ कोळी, सदस्य पांडुरंग कोळी, हेमंत कोळी, बळीराम कोळी, ‘फगवाले मच्छीमार संघटना'चे अध्यक्ष अनंता बोस, ‘खांदेवाले मच्छिमार संघटना'चे अध्यक्ष रमेश हिंडे, निलकंठ कोळी, डोलकर मच्छिमार सदस्य तुकाराम कोळी, ‘मनसे'चे बेलापूर विभाग उपजिल्हा संघटक भूषण कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संतोष कोळी तसेच ‘भाजपा' पदधिकारी आणि स्थानिक कोळी बांधव उपस्थित होते. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

भाजपा अनु.जाती मोर्चाच्या नवी मुंबई जिल्हाध्यक्षपदी राजेश शिंदे यांची नियुक्ती