महापालिकेची ९ महिन्यात ४६५.७० कोटींची कर वसुली

३१ डिसेंबर पर्यंत गतवर्षीच्या तुलनेत ६७.०५ कोटी अधिक कर वसुल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत असून यामधूनच महापालिकेला विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी-कर्मचारी समुहाने मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यादृष्टीने नियोजनबध्द पावले टाकीत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर विशेष लक्ष दिल्यानेच गत १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२३ या ९ महिन्यांच्या कालावधीत ४६५.७० कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात विभागाने यश मिळवलेले आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत ३९८.६५ कोटी इतकी कर वसुली झाली असून यावर्षी त्यापेक्षा अधिक ६७.०५ कोटी रकमेची कर वसुली झाल्याने महापालिकेच्या सेवा-सुविधांकरिता अधिकचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने सन २०२३-२४ करिता अर्थसंकल्पात दिलेला ८०० कोटींचा लक्ष्यांक साध्य करणे या उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वीरित्या वाटचाल सुरु आहे.

सदर उद्दिष्टपूर्तीकडे वाटचाल करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागातील अधिकारी- कर्मचारी यांच्या वारंवार बैठका घेत थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने यादी तयार करुन प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून दिले. तसेच सातत्याने आढावा घेत याबाबतच्या कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यासोबतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीदारांच्या वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. तसेच मागील वर्षात करनिर्धारण झालेल्या मात्र मालमत्ताकर भरणा बाकी असलेल्या थकबाकीदारांच्या करवसुलीकडेही विशेष लक्ष पुरविण्यात आले.

त्याचप्रमाणे नवीन करनिर्धारण करण्यात आलेल्या मालमत्ता तसेच पहिल्या टप्प्यात औद्योगिक एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या लिडार सर्वेक्षणाचा उपयोग काही प्रमाणात होऊन मालमत्ता कर वसुलीला गती लाभली. याचीच परिणिती म्हणून मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर अखेर पर्यंत ६७ कोटी ५ लाख रुपयांची अधिक मालमत्ताकर वसुली झालेली दिसून येत आहे.

३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मालमत्ताकर वसुली (विभागनिहाय) :
विभाग रवकम
बेलापूर ४६.४३ कोटी
नेरुळ ९०.०१ कोटी
वाशी ३५.७२ कोटी
तुर्भे ७८.३९ कोटी
कोपरखैरणे ८०.७० कोटी
घणसोली ४९.८१ कोटी
ऐरोली ५७.७१ कोटी
दिघा १४.५६ कोटी
मुख्यालय १२.३२ कोटी
एकूण ४६५.७० कोटी

सन २०२३-२४ वर्षांमध्ये अर्थसंकल्प सादर करताना मालमत्ता कर विभागाला ८०० कोटी रुपये रवकमेचे उद्दिष्ट दिलेले असून त्यादृष्टीने नियोजनबध्द कार्यवाही करण्यात येत असून उद्दिष्टपूर्ती होईल. विहित वेळेत मालमत्ताकर भरणा करणाऱ्या तसेच थकबाकी भरणा करणाऱ्या नागरिकांचे आभार व्यक्त करतो. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप आपली थकबाकी आणि मालमत्तकराचा भरणा केला नाही त्यांनी तो करावा. तसेच आपल्यावर कारवाईची कटू वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करतो.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घणसोली मध्ये ९० लाखांची वीजचोरी उघड