ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘ठाणे'मध्ये नालेसफाईचे ६० टक्के काम पूर्ण
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात नालेसफाईचे काम काहीसे उशीरा सुरु झाले असले तरी आता ते सरासरी ६० टक्के झाले आहे. नालेसफाईचे काम वेगाने सुरु असून ३१ मे पर्यंत सर्व काम पूर्ण होईल, असा विश्वास ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात नालेसफाईचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला ५ जून पर्यंत काम पूर्ण करण्याचे लक्ष्य देण्यात आले आहे, अशी माहितीही आयुक्त राव यांनी दिली.
२४ मे रोजी महापालिका आयुक्त राव यांनी नालेसफाईच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रथम, कळवा येथील महात्मा फुलेनगर येथील नाल्यातील गाळ काढण्याचा कामाचा आयुवतांनी आढावा घेतला. रस्त्यावर आलेला गाळ लवकर हटवून रस्ता पूर्णपणे वाहतुकीसाठी मोकळा करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी दिल्या.
यानंतर आयुवत राव यांनी उथळसर प्रभाग समितीतील ऋतू पार्क येथील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली. वर्तकनगर प्रभाग समितीतील कापूरबावडी नाला, थिराणी नाला, वागळे इस्टेट मधील आनंद इंडस्ट्रीज येथील नाला, नौपाडा प्रभाग समितीतील सुपरमॅक्स कंपनी लगतचा नाला, परब वाडी येथील नाला येथे आयुक्त राव यांनी पाहणी केली.
याप्रसंगी अतिरिवत आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, स्थानिक कार्यकारी अभियंता, आदि उपस्थित होते.
दरम्यान, पावसाळा दाखल होण्याची शक्यता लक्षात घेऊन नालेसफाईचे काम आणखी जलद करावे. तसेच नाले, गटारे यातून काढलेला गाळ तातडीने उचलावा, याचा आयुक्त राव यांनी पुनरुच्चार केला.
वस्ती मधील नाल्यात टाकला जाणारा कचरा रोखण्यासाठी या नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. त्यात साठणारा कचरा नियमितपणे उचलला जावा. म्हणजे नाल्यात वारंवार पडणारा कचरा साठून पावसाळ्यापूर्वी होणारी कसरत आणि कोट्यवधींचा खर्च कमी होईल. त्यादृष्टीने पावले उचलण्यात यावीत. नाल्यात कचरा टाकू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात यावी. तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक यांची मदत घ्यावी.
-सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.