डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील ‘संकल्पपत्र' जाहीर

डोंबिवली : गेली १० वर्ष ‘कल्याण लोकसभा मतदारसंघ'मध्ये विकास कामे करुन जनतेच्या मनातील खासदार अशी छाप पडलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कामाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी खासदार डॉ. शिंदे यांना पत्र लिहून कामाचे कौतुक केले आहे. यावर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कौतुकाची थाप म्हणजे आणखी विकास कामे करण्यासाठी प्रोत्साहन असल्याची प्रतिक्रिया पत्रकारांसमोर दिली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जाहीरनाम्यातील संकल्पपत्र जाहीर करण्यात आले. ‘संकल्पपत्र'मध्ये विकास कामांचा धडाका असून यात सुखद रेल्वे प्रवास, आरोग्य, शाळा, रस्ते, मेट्रो, पार्किंग सुविधा यावर भर देण्यात आला आहे. ‘कल्याण लोकसभा मतदार संघ'मधील ‘महायुती'चे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या ‘संकल्पपत्र'चे १६ मे रोजी डोंबिवली जिमखाना  येथे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी ‘मनसे'चे आमदार प्रमोद (राजू) पाटील, माजी खासदार आनंद परांजपे, युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, तालुका प्रमुख महेश पाटील, प्रकाश म्हात्रे, एकनाथ पाटील, भाजपा कल्याण लोकसभा निवडणूक प्रमुख शशिकांत कांबळे, कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, माजी नगरसेवक मंदार हळबे, विकास म्हात्रे, शैलेश धात्रक, राहुल दामले, यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी माजी खासदार आनंद परांजपे यांनी डॉ. श्रीकांत शिंदे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास व्यक्त केला. तर भाजपा कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांना विकमी मतांनी निवडून आणण्यचे आवाहन केले. मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विकास कामांचे यावेळी कौतुक केले.

दरम्यान, ‘कल्याण'मधील जनतेने मला दोन निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्याने निवडून आणले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली ‘कल्याण लोकसभा मतदातसंघ'मध्ये विकास कामे केली. १५ मे रोजी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेऊन मला जिंकून येण्याचा आशीर्वाद दिला. पंतप्रधान मोदी यांनी पत्र दिले असून ते पत्र माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. मला या पत्रातून कामांबाबत कौतुकाची थाप दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदी यांनी दिली आहे, असे ‘संकल्पपत्र'ची माहिती देताना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

‘संकल्पपत्र'मध्ये मी खासदार म्हणून कोणती विकास कामे करणार आहे, त्यांची माहिती दिली आहे. ६००० कोटी पेक्षा जास्त कामे रेल्वे आणि रोड वे वर केली आहे. मी लवकरच कल्याणमध्ये ८०० कोटींचा प्रकल्प राबविणार आहे, असे डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

४ जूनला जनता डीमोदीनेशन करेल -उध्दव ठाकरे