श्री दत्त मंदिर विद्यालयचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

नवी मुंबई : सानपाडा येथे श्री दत्त मंदिर नवी मुंबई महापालिका शाळा क्र.१८ आणि माध्यमिक शाळा क्र.११६ येथे २ मार्च रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि विद्यार्थी-पालकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादात संपन्न झाले.

खाजगी शाळेत ज्या पालकांची फी भरण्याची आर्थिक परिस्थिती नसते, असे जवळपास १ हजार गरीब आणि गरजू विद्यार्थी श्री दत्त मंदिर शाळेत शिकत असून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सदर कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला. गेली १५ वर्ष अशाप्रकारे महापालिका शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन साजरे करणारी श्री दत्त मंदिर सानपाडा, एकमेव शाळा असावी. या सोहळ्याच्या आयोजनासाठी माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर आणि माजी नगरसेविका सौ. कोमल वास्कर यांनी नेहमीप्रमाणे बहुमोल सहकार्य केले.

या शाळेला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी सदर पुरस्कार मिळविले आहेत, त्यांचा शाल आणि तुळशी वृंदावन देऊन सत्कार करण्यात आला. सदर ‘स्नेहसंमेलन'प्रसंगी या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेते अय्याउद्दीन शेख, ‘पोर्ट ट्रस्ट कामगार अंक'चे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव,  माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, सौ. कोमल वास्कर, शिवसेना महिला विभागसंघटक सौ. कविता ठाकुर, सौ. नेहा वास्कर,  शिवसेना उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे, विभागप्रमुख अजय पवार, आशिष वास्कर, उपविभागप्रमुख तानाजी चव्हाण, संजय पाटील, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, अतुल डेरे, रवि देशमुख, रणधीर सुर्वे, प्रल्हाद गायकवाड, बबन ठाकुर, प्रमोद ठाकुर, डॉ. भूषण जैन, ७.५० गार्डन ग्रुप, वाडा ग्रुप आणि ‘श्री दत्त मंडळ'चे सदस्य आदि उपस्थित होते.

मुख्याध्यापिका जयश्री विधाटे आणि मुख्याध्यापक मंगल भोईर यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले. यावर्षी वार्षिक स्नेहसंमेलनात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी संस्कृती भारताची या विषयावर आधारित विविध गायनाच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. गायन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल २ विद्यार्थ्यांना सोमनाथ वास्कर आणि सौ. कोमल वास्कर  यांनी दत्तक घेऊन त्यांचा पुढील गायनाचा खर्च ते करणार आहेत.

स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे निवेदन स्मिता धमामे यांनी केले. तर विद्यार्थ्यांचे नृत्य ईशांत ठाकुर आणि सौ. हिनल ठाकुर यांच्या नृत्यांगणा डान्स अकादमी तर्फे बसविण्यात आली. स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक आणि शालेय बहुउद्देशीय कामगारांनी मेहनत केली. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

केडीएमसी हद्दीतील 627 असाक्षरांची प्रथम चाचणी