ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
आ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांना यश
नवी मुंबई : बेलापूर मतदारसंघातील भाजपा आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नाने वाशी सेक्टर-८ आणि बेलापूर सेक्टर-१२ मध्ये नवीन पावसाळी जलउदंचन केंद्र लवकरच उभारण्यात येणार आहे.
वाशी, बेलापूर येथील पर्जन्य जलउदंचन केंद्र उभारण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर बेलापूर-सीबीडी आणि वाशी परिसरात पावसाळी पाणी साचण्याचा प्रश्न निकाली निघेल, असा विश्वास आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला.
बेलापूर, वाशी येथील पावसाच्या पाण्याचा नैसर्गिक पध्दतीने निचरा होऊ शकत नसल्याने त्याला पर्यायी उपाययोजना म्हणून नवीन पावसाळी जलउदचंदन केंद्र उभारण्यात येणार आहे. सीबीडी परिसरात पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे सीबीडी येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये याकरिता नवी मुंबई महापालिकेने येथील पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढविण्याची कामे हाती घेतली आहेत. वाशी येथील जलउदंचन केंद्रासाठी अपेक्षित खर्च ३७ कोटी ३१ लाख आणि बेलापूर जलउदंचन केंद्रासाठी अपेक्षित खर्च ३४ कोटी ५३ लाख इतका येणार आहे.
दरम्यान, वाशी आणि बेलापूर या याठिकाणी जलउदंचन केंद्र उभारण्याचे काम लवकरच सुरु होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.