विविध घटकांच्या विकासासाठी शासन कटीबध्द - ना. दिपक केसरकर

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य विविध आघाड्यांवर मार्गक्रमण करीत आहे. समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध घटकांच्या विकासासाठी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही राज्याचे शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री ना. दिपक केसरकर यांनी दिली.

७५ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा ठाणे मधील साकेत पोलीस परेड मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ना. दिपक केसरकर यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात येवून त्यास सलामी देण्यात आली. यावेळी ना. दिपक केसरकर बोलत होते.

    याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, विशेष महानिरीक्षक प्रवीण पवार, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) डॉ. महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त (प्रशासन) संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये, ठाणे ग्रामीण पोलीस अपर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली घाटे-घाडगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी, उपजिल्हाधिकारी (सर्वसाधारण) गोपीनाथ ठोंबरे,उपजिल्हाधिकारी विकास गजरे, रेवती गायकर, दिपक चव्हाण, उर्मिला पाटील, रोहित राजपूत, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, पोलीस उपायुक्त श्री. गणेश गावडे, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गंगाधर परगे, समाज कल्याण सहायक आयुक्त समाधान इंगळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, प्रमोद काळे, संजय बागूल, ‘जलजीवन मिशन'चे प्रकल्प संचालक पंडित राठोड, ठाणे जिल्हा कौशल्य विकास सहायक आयुक्त संध्या साळुंखे, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढाकणे, तहसिलदार संजय भोसले, युवराज बांगर, रेवण लेंबे, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील इतर अधिकारी-कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यव्रÀमात पोलीस दल पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली. तसेच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीत धून वाजविण्यात आली.

‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे' या मोहिमेत ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरु झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील सर्वंकष स्वच्छता मोहिमेची सुरुवात ठाणे शहरात ३० डिसेंबर २०२३ पासून झाली आहे. सर्वंकष स्वच्छता मोहीम २४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. सारथी प्रकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील मराठा/कुणबी/ मराठा-कुणबी/कुणबी-मराठा प्रवर्गातील ग्रामीण भागातील १८० आणि शहरी भागातील ६२० मिळून एकूण ८०० उमेदवारांना मोफत कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तर्फे ‘कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून २८९ नामांकित उद्योजकांसमवेत केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून २ लाख ७ हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती यावेळी ना. दिपक केसरकर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 २८ जानेवारी रोजी भाजी मार्केट सुरु; कोंडी फुटल्याने शेतमालाची आवक