‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'तर्फे ७ व्या प्रॉपर्टी प्रदर्शनाची घोषणा

नवी मुंबई : ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'च्या वतीने ७ व्या मालमत्ता प्रदर्शनाची घोषणा करण्यात आली आहे. नवी मुंबईसह रायगडच्या रिअल इस्टेट लॅन्डस्केप मधील एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम असणारा ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'चे ७ वे रिअल इस्टेट एवस्पो येत्या २ ते ५ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत खांदेश्वर रेल्वे स्टेशन जवळ आयोजित करण्यात आल्याची माहिती ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'च्या वतीने पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली. यंदा मालमत्ता प्रदर्शनासाठी ‘अभी नही तो कभी नही' अशी संकल्पना ठेवण्यात आली आहे.

या पत्रकार परिषद प्रसंगी ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'चे अध्यक्ष अश्विन पटेल, माजी अध्यक्ष जितभाई पटेल, मेन्टॉर वसंत भद्रा, विश्वस्त भद्रेश शाह, चिराग शाह, संयोजक विघ्नेश पटेल, सेक्रेटरी मुकेश पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

यंदाच्या मालमत्ता प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध लहान-मोठ्या बांधकाम व्यावसायिकांकडून त्यांच्या गृहप्रकल्पांमधील सामान्यांना परवडणारे ते लवझरीयस अशी २५ लाखांपासून ते ५ कोटी रुपयांपर्यंतची घरे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. याद्वारे ग्राहकांना त्यांच्या स्वप्नातील मनपसंद घर घेण्याची संधी मिळणार असल्याचे अध्यक्ष अश्विन पटेल यांनी सांगितले.

या मालमत्ता प्रदर्शनात बांधकाम व्यावसायिकांचे विविध गृहनिर्माण प्रकल्प सादर करणारे १०० च्या आसपास स्टॉल्स राहणार असून त्यामध्ये काही नामांकित वित्तीय संस्थांचे माहिती देणारे स्टॉल्सही असतील. त्यामुळे मालमत्ता प्रदर्शन विकासक, खरेदीदार यांना एकाच व्यासपीठावर आणून ग्राहकांना विविध प्रकल्प एकाच ठिकाणी पाहण्याची संधी देणारे आहे. त्यामुळे या मालमत्ता प्रदर्शनामधील नवी मुंबईसह रायगड मधील विविध गृहप्रकल्पांच्या स्टॉल्सना नागरिकांनी भेट देण्याचे आवाहन ‘क्रेडाई- बीएएनएम रायगड'चे अध्यक्ष अश्विन पटेल यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेलमध्ये ‘शक्तीवंदन' कार्यशाळा उत्साहात संपन्न