ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
केडीएमसी हद्दीतील 627 असाक्षरांची प्रथम चाचणी
डोंबिवली : महाराष्ट्र शालेय शिक्षण (योजना)विभागाने सर्वेक्षणात आढळून आलेल्या असाक्षरांची प्रथम चाचणी रविवार 17 तारखेला घेण्यात आली. या चाचणीचे पुर्व नियोजन क.डों.मनपा शिक्षण नियोजनबद्ध प्रकारे शिक्षण विभागाने केलेले होते .सिआरसी प्रमुख आणि परिक्षा केंद्रांचे संचालक यांना मिटिंगमध्ये महत्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. सिआरसी प्रमुखांचे परिक्षा केंद्रावर नियंत्रण होते.
क.डो.मनपा शिक्षण विभाग क्षेत्रात एकूण 627 असाक्षरांची प्रथम चाचणी घेण्यात आलेली असुन एकूण 82 परिक्षा केंद्रावर असाक्षरांची परिक्षा सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत घेण्यात आली. परिक्षा केंद्रावर अधिकारी, कर्मचारी , SSAकर्मचारी यांच्या भेटी परिक्षेच्या वेळी झाल्या. वरिष्ठ नागरिक यांनी देखील काही ठिकाणी असाक्षरांची चाचणी दिली.सदरील परिक्षेच्या संदर्भात. शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी विजय सरकटे आणि प्रशासन अधिकारी रंजना राव यांच्या आदेशाने आणि सुचनेनुसार सदरील परिक्षा पार पडली आहे.परिक्षा चांगल्या व शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी अधिकाऱी , कर्मचारी (SSA) सर्व सिआरसी प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळाले.शिक्षण विभागाचे सदरील परिक्षेचे कामकाज शि.वि.अधिकारी लक्ष्मण जाधव, नोडल अधिकारी आणि चंद्रमणी सरदार विषय तज्ञ तसेच तंत्रस्नेही शिक्षक विलास विखार यांनी काम बघीतले.