सृष्टी पाटील उरण तालुक्यात प्रथम

पनवेल : ‘जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था'चे पदाजी पांडुरंग मुंबईकर इंग्लिश मिडीयम स्कूल, वेश्वी या शाळेचा इयत्ता दहावी बोर्डाचा एकूण निकाल सलग सहाव्या वर्षी १०० टक्के इतका लागला आहे. स्कूलची विद्यार्थिनी सृष्टी किरण पाटील हिने ९६ टक्के गुण मिळवून संपूर्ण उरण तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकावला. हर्ष केशव ठाकूर ८६.६० टक्के गुण मिळवून शाळेत द्वितीय तसेच विघ्नेश अजित याने ८६ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे.

शाळेच्या एकूण निकालामध्ये ६५ विद्यार्थ्यांपैकी १६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर ४४ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवून घवघवीत यश संपादन केले. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल ‘संस्था'चे संस्थापक जे. एम. म्हात्रे, अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे, सचिव जे. के. मढवी, ‘शाळा समिती'चे चेअरमन चंद्रकांत मुंबईकर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रितम टकले, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. तृप्ती म्हात्रे यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शहरी भागातील विद्यार्थ्यांसोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी जे. एम. म्हात्रे यांच्या विचाराने सुरु केलेल्या शाळांमधील निकाल पाहून समाधान वाटते. यापुढेही आम्ही विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी विशेष प्रयत्न करु. - प्रितम म्हात्रे, अध्यक्ष-जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

 आरटीई प्रवेश अर्ज स्वीकारण्यास ४ जून पर्यंत मुदतवाढ