कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.ए.पाटील यांचे निधन

नवी मुंबई : रयत शिक्षण संस्थेच्या वाशी सेवटर १५ येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे माजी प्राचार्य बी.ए.पाटील यांचे प्रदीर्घ आजाराने २३ जानेवारी पहाटे ५ वाजता निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते.

प्रा. पाटील यांच्यावर आधी अपोलो हॉस्पिटल बेलापूर येथे व नंतर वाशी येथील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांचे पार्थिव सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुवयातील नगराळे या गावी नेण्यात आले व संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांसाठी पाटील यांनी समर्पित वृत्तीने, प्रामाणिकपणे काम करुन वेगळा आदर्श उभा केला होता. राजापूर येथील महाविद्यालयाच्या उभारण्यासाठी त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली होती. २००६ साली वाशीच्या क.भा.पाटील महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाल्यानंतर ते खारघर येथे रहात होते. रयत शिक्षण संस्थेच्या नवी मुंबईतील विविध विद्यमान व माजी रयतसेवकांनी तसेच पाटील सरांच्या माजी विद्यार्थ्यानी त्यांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली अर्पण केली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘अन्नपूर्णा परिवार'ची वार्षिक सभा संपन्न