एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे पर्यावरण संवर्धनासाठी तयार करण्यात आले सीड बॉल..
नवी मुंबई: एस.आर.दळवी (I) फाऊंडेशन ही संस्था पर्यावरण संवर्धन व शिक्षक सक्षमीकरण यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली शैक्षणिक क्षेत्रातील विश्वसनीय सेवाभावी संस्था आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी दळवी फाऊंडेशनद्वारे विविध सामाजिक संस्थांसोबत संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण आणि संवर्धनाचे विविध कार्यक्रम आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आले आहेत.
दिनांक ४ मे रोजी, पारंपारिक पद्धतीने वृक्षारोपण न करता बीजगोळे अर्थात सीडबॉल तयार करून असाच एक उपक्रम एस आर दळवी (I) फाऊंडेशनद्वारे बेलापूर येथे राबविण्यात आला. खैर, जांभूळ, बोर, चिंच, गुंज अशा वेगवेगळ्या दहापेक्षा जास्त प्रकराच्या बिया मिळवून शेण व मातीचा वापर करून हे सीड बॉल तयात करण्यात आले. Shree Ram Enterprises मधील सर्व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला व सर्वानी मिळून जवळपास १५०० सीड बॉल्स तयार केले. हे सीड बॉल्स बस थांबा, एसटी डेपो, रेल्वे स्थानक, संस्थांच्या कार्यालयातदेखील हे ‘सीडबॉल’ पाठवले जाणार आहेत. या उपक्रमामुळे विविध प्रकारची वृक्षवल्ली नक्कीच बहरताना दिसून येईल.
संस्थेचे संस्थापक रामचंद्र दळवी, श्रीमती. सीता दळवी, संतोष परब, शिवम दळवी यांच्या मार्गदर्शना अंतर्गत हा उपक्रम यशस्विरित्या पार पडला.