८५ वर्षांवरील ज्येष्ठ, दिव्यांग मतदारांचे गृहमतदान

ठाणे : लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी ‘भारत निवडणूक आयोग'ने घरुनच मतदान करण्यासाठी सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्याअंतर्गत २५-ठाणे, २४-कल्याण आणि २३-भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये गृहमतदानाला सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षावरील एकूण २६२ नागरिकांनी तर ३८ दिव्यांग मतदारांनी, कल्याण लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील २१५ मतदारांनी तर ४४ दिव्यांग मतदारांनी आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघात ८५ वर्षांवरील १८५ नागरिकांनी गृहमतदान केले आहे. विशेष म्हणजे १३७-भिवंडी पूर्व मध्ये मारुती भाऊ राणे या १०० वर्षांच्या सर्वात ज्येष्ठ मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला.

ठाणे लोकसभा मतदारसंघ अंतर्गत १४५-मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-३४, दिव्यांग मतदार-३), १४६-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-४६, दिव्यांग मतदार-१६), १४७-कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-२२, दिव्यांग मतदार-४), १४८-ठाणे विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-१०३, दिव्यांग मतदार-२), १५०-ऐरोली विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-१८, दिव्यांग मतदार-४), १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघ (८५ वर्षांवरील मतदार-३९, दिव्यांग मतदार-९) असे गृहमतदान झाले आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात एकूण ७ विधानसभा मतदारसंघात ८५ वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेल्या पुरुष मतदारांची संख्या  १५०२१, महिला मतदारांची संख्या १२,३०४ इतकी आहे.

दरम्यान, ज्या मतदारांनी ‘निवडणूक आयोग'मार्फत १२ अ नमुना अर्ज भरुन दिले आहेत, त्या मतदारांचे गृहमतदान करुन घेतले जाणार असल्याचे ‘२५-ठाणे लोकसभा मतदार संघ'च्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी सांगितले.

कल्याण लोकसभा मतदार संघातील ६ विधानसभा मतदार संघ मध्ये वय वर्ष ८५ व त्यावरील २१५ मतदार आणि ४४ दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हवक बजावला आहे. याअंतर्गत १४१-उल्हासनगर विधानसभा मतदारसंघामध्ये वय वर्ष ८५ व त्यावरील ४२ मतदारांपैकी ३० मतदारांनी गृहमतदान करुन आपला मतदानाचा हवक बजावला, असे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी-उल्हासनगर विजयानंद शर्मा यांनी सांगितले.

भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांनी गृहमतदान केले. यामध्ये १३४-भिवंडी ग्रामीण विधानसभामध्ये ८९ पैकी ८७ मतदारांनी, १३५-शहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये ७० पैकी ६५ मतदारांनी, १३६-भिवंडी पश्चिम विधानसभामध्ये २० पैकी १६ मतदारांनी, १३७ भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये १७ वयोवृध्द आणि दीव्यांग व्यक्ती यांनी मतदानाचा हक्क बजावला. १३७-भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघमध्ये मारुती भाऊ राणे या १०० वर्षांच्या सर्वात ज्येष्ठ मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला.

दरम्यान, गृहमतदान येत्या १५ मे २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाऊले हुकूमशाहीकडे -शरद पवार