पावणे एमआयडीसी मधील रासायनिक कंपनीला भीषण आग

सुदैवाने जीवितहानी टळली

वाशी : नवी मुंबई शहरातील पावणे एमआयडीसी मधील डब्लू ६, महेक केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना ४ जानेवारी रोजी सकाळी घडली. आगीची माहिती मिळतात अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाले नाही, अशी माहिती पावणे अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

महेक कंपनी मध्ये रसायन बनवण्याचे  काम होत असून,  ४ जानेवारी रोजी सकाळी महेक केमिकल कंपनी मध्ये आग लागली. आगीची घटना समजताच एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. महेक केमिकल कंपनी रसायनाची असल्याने आगीने थोड्याच वेळात भीषण रुप धारण केले होते. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत सुमारे साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दल जवानांनी महेक केमिकल कंपनी मध्ये लागलेली आग आटोक्यात आणली. या आगीत कुणीही जखमी किंवा मृत झाले नाही, अशी माहिती पावणे एमआयडीसी अग्निशमन दलातील अधिकारी एस. एल. पाटील यांनी दिली.

पावणे एमआयडीसी मधील महेक केमिकल कंपनीत ४ जानेवारी रोजी सकाळी आग लागली असताना पावणे भागात आणखी एका कंपनीत किरकोळ आग लागल्याची घटना घडली.पावणे एमआयडीसी मधील नट  व्याली प्रा.लि. या बदाम सोलणाऱ्या कंपनीत  सुमारे आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. मात्र,पावणे एमआयडीसी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नोकरदार महिलांसाठी जागरुकता अभियान शुभारंभ