डॉ.आंबेडकर जयंतीदिनी शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके

नवी मुंबई: कोपरखैरणे येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंतीउत्सव आयोजक अध्यक्ष संतोष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली छावा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने शिवकालीन शस्त्रांचे शस्त्र प्रदर्शन व शिवकालीन मर्दानी खेळाचे चित्तथरारक प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. 

या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण  छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश व त्यांचे मर्द मावळे आणि रणरागिणींनी व्ोÀले. या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक व नमुंमपा स्थायी समिती माजी सभापती आणि शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शिवराम पाटील, माजी नगरसेविका सायलीताई शिंदे, समाजसेवक नारायण शिंदे उपस्थित होते. छावा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वस्ताद अमित गडांकुश सर यांचा शिवकालीन शस्त्रांचा संग्रह बघून उपस्थितांनी त्यांचे  कौतुक केले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी मध्ये संविधान, संसद भवनाची प्रतिकृती