‘पलेमिंगो'च्या उड्डाणातील अडथळा लवकरच दूर?

वाशी : नेरुळ- सीवूड्‌स पाणथळ क्षेत्रात हिवाळा त्रतूमध्ये पलेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. मात्र, येथील नेरुळ जेट्टीचा नामफलक या ‘पलेमिंगों'च्या उड्डाणात अडथळा निर्माण करीत आहे. गेल्या अवघ्या १५ दिवसात नेरुळ जेट्टीच्या नामफलकाला धडकून ७ ‘पलेमिंगों'चा मृत्यू तर २ पलेमिंगो जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे नेरुळ जेट्टीचा नामफलक तात्काळ हटवण्याची मागणी पक्षीप्रेमींकडेन करण्यात आली होती. त्यानुसार ‘सिडको'ने नेरुळ जेट्टीचा नामफलक हटवण्याच्या  हालचाली सुरु केल्या आहेत.

नवी मुंबई शहरात मोठ्या संख्येने परदेशी ‘पलेमिंगो' पक्षी दाखल होत असल्याने नवी मुंबई शहराला ‘पलेमिंगो सिटी' म्हणून संबोधण्यात येत आहे. नेरुळ-सीवूड्‌स खाडी किनाऱ्यावर सध्या मोठ्या प्रमाणात हिवाळ्याच्या मोसमात पलेमिंगो पक्षांचे आगमन होण्यास सुरुवात झालीं आहे. मात्र, याच ठिकाणी सिडको द्वारे जल प्रवासी वाहतूक जेट्टी उभारण्यात आली असून, सदर जेट्टी सध्या बंद आहे. या जेट्टीचा मोठा नामफलक जेट्टी जवळ लावण्यात आला आहे. सूर्योदय आधी अंधार असल्याने सदर नामफलक ‘पलेमिंगो' पक्षांना दिसत नसून, सदर नामफलक पलेमिंगोंच्या उड्डाणात अडथळा ठरत आहे. या नामफलकावर आदळून २ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी या १५ दिवसात नेरुळ येथे एकूण सात  पलेमिंगोंचा मृत्यू तर दोन पलेमिंगो जखमी झाले आहेत.पलेमिंगोसाठी नेरुळ जेट्टीचा नामफलक कर्दनकाळ ठरत आहे. त्यामुळे नेरुळ जेट्टीचा नामफलक सिडको किंवा वन अधिकाऱ्यांनी सदर जागेवरून न हलवल्यास आणखी पक्ष्यांचे नुकसान होण्याची भीती आहे. परिणामी नेरुळ जेट्टीचा नामफलक तात्काळ   हटवावा, अशी मागणी सेव्ह नवी मुंबई एन्व्हायर्नमेंट संस्थेचे  पर्यावरणतज्ज्ञ सुनील अग्रवाल, ॲड. प्रदीप पाटोळे आणि नवी मुंबई शहरातील  पर्यावरण प्रेमींनी  ‘सिडको'कडे केली होती. या मागणीची दखल घेऊन, नेरुळ जेट्टीचा नामफलक लवकरच हटवण्यात येईल, असे आश्वासन ‘सिडको'चे  सहसंचालक कैलास शिंदे यांनी  पर्यावरण प्रेमी श्रुती अग्रवाल यांना ७दिले होते. त्यानुसार आता नेरुळ जेट्टीचा नामफलक हटवण्याच्या हालचाली सिडकोकडून सुरु करण्यात आल्या आहेत.

‘सिडको'ने नेरुळ येथे जल प्रवासी वाहतूक जेट्टी उभारली असून, सदर जेट्टी सध्या बंद आहे. या जेट्टीचा मोठा नामफलक जेट्टी जवळ लावण्यात आला आहे. सूर्योदय आधी अंधार असल्याने सदर फलक  पक्षांना दिसत नसून, सदर नामफलक पलेमिंगो पक्षांच्या उड्डाणात अडथळा ठरत आहे.  नेरुळ जेट्टीच्या नामफलकावर आदळून पलेमिंगो पक्षांचा मृत्यू होत आहे. ‘सिडको'ने नेरुळ जेट्टीचा नामफलक हटवण्याच्या हालचाली सुरु केल्या असल्या तरी देखील या नामफलकाचा सांगाडा अजून शिल्लक आहे. त्यामुळे नामफलकाचा सांगाडा देखील तात्काळ काढण्याची गरज आहे. - सुनील अग्रवाल, पर्यावरणतज्ज्ञ - नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कॉरिडोर बाधित शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा