रस्ते सुरक्षितता उपाययोजनांचा महापालिका आयुवतांकडून आढावा

उपाययोजना करताना अपघातप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिका, वाहतूक पोलीस, प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अशा सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून आवश्यक उपाययोजना कराव्यात. उपाययोजना करताना अपघातप्रवण क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. रस्त्यांवर टाकल्या जाणाऱ्या स्पीड ब्रेकरच्या तांत्रिक तपशीलाचीही बारकाईने तपासणी करावी आणि स्पीड ब्रेकर्स नियमावलीनुसार प्रमाण आकारमानातच असावेत, अशा सूचना महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांनी दिल्या आहेत.

नवी मुंबई शहरातील अपघातप्रवण क्षेत्रात सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी डीआयएमटीएस यांच्या अहवालानुसार महापालिकेच्या वतीने गठीत करण्यात आलेल्या ‘विशेष समिती'च्या आढावा बैठकामध्ये ‘समिती'चे अध्यक्ष तथा महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या अनुषंगाने झालेल्या आणि सुरु असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. याप्रसंगी समिती सदस्य शहर अभियंता संजय देसाई, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड, ‘आयआयटी मुंबई'चे तज्ञ प्राध्यापक के.व्ही.के. राव, अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रतिनिधी समिती सदस्य प्रा. मंजुला देवी तसेच महापालिकेचे सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

सर्वोच्च न्यायालयाने याचिका क्र.२९५/२०१२ मध्ये रस्ता सुरक्षेबाबत दिलेल्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या ‘उच्चस्तरीय समिती'ने रस्ते सुरक्षा संदर्भात अभ्यास करुन उपाययोजना सुचविण्यासाठी दिल्ली इंटिग्रेटेड मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम (घ्श्ऊए) या संस्थेची नियुक्ती केली होती. सदर संस्थेच्या शिफारशीनुसार स्थानिक पातळीवर अपघातप्रवण  क्षेत्राचा (ँत्ीम्व् एज्दू) अभ्यास करुन त्या ठिकाणी अपघात होऊ नयेत याकरिता प्राधान्याने आवश्यक उपाययोजना करण्याचे सूचित केले होते. त्यास अनुसरुन महापालिकेच्या वतीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली संबधित सर्व प्राधिकरणांची रस्ते सुरक्षा समिती गठीत करण्यात आली. याबाबत आवश्यक उपाययोजनांची पाहणी, तपासणी करुन आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्यास सुरुवात करण्यात आली. 

 नवी मुंबईतील ववीन नेकलेस म्हणून ओळखला जाणारा पामबीच मार्ग वाहन चालकांचा पसंतीचा रस्ता म्हणून सुपरिचित आहे. तरीही पामबीच मार्गावर होणारे अपघात चिंतेचा विषय असून या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका वाहतूक पोलिसांच्या सहयोगाने प्रयत्नशील आहे. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ‘रस्ते सुरक्षा समिती'च्या मागील बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात येऊन पामबीच मार्गासह शहरातील इतर अपघातप्रवण जागांची आयआयटी मार्फत शास्त्रीय पध्दतीने अभ्यास करण्यात येऊन आवश्यक उपाययोजना सूचविण्यात आल्या होत्या. सदर सुचनांनुसार महापालिकेमार्फत तत्परतेने कार्यवाही सुरु करण्यात आली. मागील वर्षभरात अपघातांची संख्या कमी होऊन सदर उपाययोजनांची फलश्रुतीही निदर्शनास आली. याविषयीची सविस्तर आकडेवारी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी सादर केली.

पामबीच मार्गावर झालेल्या अपघाताच्या विविध कारणांचा विचार करताना चालकाचे वेगावर नियंत्रण सुटणे अशी बाब प्रामुख्याने दिसून येत आहे. या अनुषंगाने स्पीडगनद्वारे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या बेजबाबदार वाहन चालकांवर वाहतूक पोलीस विभागामार्फत कारवाई करताना स्पीडगनला वाहन संख्येची मर्यादा असल्याने पामबीच मार्गावरील प्रमुख ब्लॅक स्पॉटवर ॲटोमॅटीक हाय स्पीड डिटेक्शन सीसीटिव्ही बसविण्याचे काम मागील बैठकीत निश्चित करण्यात आले होते. त्याप्रमाणे सदरचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती अभियांत्रिकी विभागामार्फत देण्यात आली. याद्वारे वाहनांच्या वेग मर्यादेवर बारकाईने लक्ष दिले जाणार असून वेगाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांची नोंद स्वयंचलीत यंत्रणेद्वारे पोलीस नियंत्रण कक्षामध्ये होणार आहे. अशा वाहनांवर ई-चलन मार्फत दंडात्मक कारवाई करणे सोपे होणार आहे. त्यामुळे सदर काम जलद गतीने करण्याचे निर्देश आयुक्त नार्वेकर यांनी बैठकीत दिले.

दरम्यान, दररोज साधारणतः ५ हजाराहून अधिक संख्येने ‘जेएनपीटी'कडे जाणाऱ्या कंटेनरसारख्या जड वाहनांचा मोठा भार आम्रमार्गावर पडत असून सदर मार्गावर प्रमाणापेक्षा जास्त उंचीचे स्पीडब्रेकर्स आहेत. शहरातही अनेक जागांवर अशीच परिस्थिती असून शहरातील रस्त्यांवर असलेल्या स्पीड ब्रेकर्सच्या तांत्रिक आकारमानावर बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर स्पीडब्रेकर त्यांच्या प्रमाणकानुसार असतील याची काळजी घेण्याच्या आणि प्रमाणानुसार करण्याचे निर्देश यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी अभियांत्रिकी विभागास दिले.

कोणताही अपघात त्या व्यक्तीवर आणि त्याच्या कुटुंबावर होणारा फार मोठा आघात असून प्रत्येकाने वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करुन वाहन चालविणे आवश्यक आहे. पामबीच मार्ग असो की इतर ठिकाणे येथे होणारे अपघात प्रामुख्याने वाहनाचा अतिवेग तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच घडत असल्याचे निदर्शनास येते. त्यादृष्टीने नवी मुंबई महापालिका वाहतूक पोलीस विभागाच्या सहकार्याने आवश्यक अशा उपाययोजना करीत आहे. मागील ५ वर्षात ज्या ज्या जागेवर अपघात झाले आहेत, त्याचे अचूक लोकेशन गुगल मॅपवर टाकून सदर जागांचा बारकाईने तांत्रिक अभ्यास करावा. त्याठिकाणी अपघात होऊ नये याकरिता आणखी उपाययोजना करण्यात याव्यात. वाहनचालकांची जबाबदारी अतिशय महत्वाची असून वेग मर्यादेचे पालन करीत आणि वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन प्रत्येकाने सुरक्षित प्रवास करावा.
-राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

वाहतुक सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई महापालिकेने ८८ पैकी ६ चौकांच्या काँक्रिटीकरणाची कामे पूर्ण केली असून १५ कामे प्रगतीपथावर आहेत. त्याचप्रमाणे शहरातील ४ अपघातप्रवण जागा तसेच इतर महत्वाच्या जागांवर वाहतूक पोलीस विभागाशी समन्वय राखून आवश्यक सिग्नल यंत्रणा वाढ आणि सक्षमीकरण, रस्त्यांवर टेबल टॉप क्रॉसींग, लेन मार्कींग, जॉमेट्री इम्प्रुव्हमेट, स्पीड ब्रेकर अशा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शहरात सायकलसारख्या प्रदुषणविरहित वाहन वापराला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने १०० कि.मी. ‘सायकल ट्रॅक'चे नियोजन असून २१ कि.मी. ‘सायकल ट्रॅक'ची निर्मिती करण्यात आली आहे.
-संजय देसाई, शहर अभियंता-नवी मुंबई महापालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी करावी लागणार कसरत