महाराष्ट्र सरकारने नवीन फौजदारी कायदे तातडीने लागू करावेत -गृहमंत्री अमित शाह
‘पर्यावरणपूरक होळी अभियानाचे संवाद सत्र
नवी मुंबई : होळीची पोळी करू दान, बाळगू विवेकाचे भान असे आवाहन करीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नवी मुंबईतील बेलापूर शाखेतर्फे, पर्यावरणपूरक होळी' अभियानांतर्गत संवाद सत्र १९ मार्च रोजी रोहिंजण येथील राजा प्रसेनजीत पब्लिक स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज' येथे पार पडले. या अभियानांतर्गत ‘होळी करू लहान व पोळी करू दान' या विषयावर जागरुकता करण्यात आली.
होळी सण साजरा करताना पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. होळीसाठी लाकडे वापरली जातात व त्यासाठी वृक्षतोड केली जाते. त्यामुळे निसर्गाची हानी होते. वृक्षतोड कमी करण्यासाठी होळी छोटी किंवा एक गाव एक होळी साजरी करूया, होळीत पुरणपोळी अर्पण केली जाते; त्या पुरणपोळीची राख होते. तीच पुरणपोळी होळीत अर्पण न करता, गरीब-गरजू लोकांना दान करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले. रंगपंचमी रासायनिक रंगानी न खेळता नैसर्गिक रंगांनी खेळूया. कारण रासायनिक रंगांचे आपल्या शरीरावर दुष्परिणांवर होतात. नैसर्गिक रंग सहज तयार करू शकतो. हळदीपासून पिवळा रंग तयार होतो. बीटापासून लाल रंग तयार होतो. या नैसर्गिक रंगांनी उत्सवात आनंदाची भरच पडेल. म्हणून पारंपारिक सण उत्सव पर्यावरणपूरक पध्दतीने साजरे करूया असा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. या संवाद सत्रात अशोक निकम यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यालयाचे विश्वस्त प्रा. रमेश करडे तसेच महाराष्ट्र अंनिस.कार्यकर्त्या ज्योती क्षिरसागर उपस्थित होत्या.