स्वीप कार्यक्रमांर्गत शाळा व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती

पनवेल : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर सिस्टेमॅटिक वोटर्स एज्युकेशन इलेक्ट्रोल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम अर्थात स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महापालिका कार्यक्षेत्र तसेच ग्रामीण भागात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांची मुख्याध्यापकांची बैठक गट प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप, गटविकास अधिकारी संजय भोये यांच्या प्रमुख उपस्थितीत २२ मार्च रोजी पंचायत समितीमध्ये घेण्यात आली.

यावेळी गट शिक्षण अधिकारी सिताराम मोहिते, महापालिकेच्या शालेय विभागाच्या अधिक्षक किर्ती महाजन, महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. यावेळी बोलताना गट प्रमुख अधिकारी संजय जगताप म्हणाले की  येऊ घातलेल्या र्सावत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती होणे महत्वाचे आहे. मुख्याध्यापकांनी शालेय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निपक्षपातीपणे जनजागृतीचे कार्यक्रम करावेत. या जनजागृती कार्यक्रमाच्या माध्यमातूनमागील निवडणुकीतील मतदानाच्या टक्केवारीपेक्षा यावेळच्या मतदानामध्ये मतांची टक्केवारी वाढवायची आहे. गट विकास अधिकारी संजय भोये याप्रसंगी म्हणाले की प्रामाणिकपणे मतदान करण्याचा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पालकांपर्यत पोहचवायचा आहे. यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या ‘मतदान जनजागृती या विषयांवरती निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, पथनाट्य, रांगोळी स्पर्धांचे आयोजन करावे. यावेळी स्वीप आराखड्यानूसार मतदार नोंदणी व त्यांचा सहभाग वाढविण्यासांठी प्रचार, प्रसिध्दी, जनजागृती कार्यक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापकांनी  स्वीप कार्यक्रम राबविण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला.  

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे पालिका आयुक्त पदाचा कार्यभार सौरभ राव यांनी स्वीकारला