छत्रपती शिवाजी महाराज यांना नवी मुंबई महापालिका तर्फे अभिवादन

नवी मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.


नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्पिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला तसेच पाचव्या मजल्यावरील राजमाता जिजाऊ सभागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याला पुष्पमालिका अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, परिमंडळ-१चे उपायुक्त सोमनाथ पोटरे, परिमंडळ-२ चे उपायुक्त डॉ. श्रीराम पवार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, भांडार विभागाच्या उपायुक्त मंगला माळवे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, सहा.संचालक (नगररचना) सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता अजय संख्ये, अरविंद शिंदे, संजय खताळ, संजीव पाटील आणि इतर अधिकारी, कर्मचारी तसेच शालेय विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळीही महाराष्ट्राच्या राज्यगीताचे समूह गायन करण्यात आले.

शिवजयंती सोहळ्याचे औचित्य साधून ॲम्फिथिएटर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनानंतर शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत शिवरायांना गीतनृत्यमय आदरांजली अर्पण केली. यामध्ये सुरुवातीलाच नेरुळ येथील विद्याभवन शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या काव्या कातळे विद्यार्थिनीने शिवचरित्रातील उल्लेखनीय प्रसंग सांगत प्रेरणादायी भाषण करुन उपस्थितांची दाद मिळवली.

महापालिका बेलापूर शाळेतील शिक्षक विकास नाईक यांनी ‘शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती' असे लोकप्रिय शौर्यगीत दमदार आवाजात सादर करुन वीररसाचा प्रत्यय दिला. त्याचप्रमाणे शाळा क्र.१०१ शिरवणे येथील २० विद्यार्थ्यांच्या समुहाने ‘शिवराज्याभिषेक सोहळा' सादर करुन शिवकाळ रंगमंचावर अवतीर्ण केला. शालेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनात असलेला शिवरायांचा आदरभाव गीतनृत्य स्वरुपात सादर करुन शिवप्रभूंना आगळ्या वेगळ्या पध्दतीने मानवंदना अर्पण केली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 खारघर सेक्टर-१२ मध्ये दुषित पाणीपुरवठा