ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
मनुष्यबळा अभावी सध्या चार सायकलचा वापर
ठाणे : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्याद्वारे विशेषश कार्यक्रम करीत जनतेत जनजागृती करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केलेले होते. तर रविवारी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्याच्या "रायझिंग डे" च्या निमित्ताने १० किमीची सायकल रॅलीचे आयोजन केले होते. सदरची रॅली ठाणे पोलीस उप आयुक्त गणेश गावडे आणि नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन कार्नाय्त आले होते. यावेळी नौपाडा पोलिसांनी चार सायकलींची उपलब्धता करीत त्या पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना देत नवी आरोग्यदायक परंपरेला सुरुवात केलेली आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नौपाडा पोलिसांनी चार सायकलीच्या माध्यमातून पेट्रोलिंग करण्याची परंपरा सुरु केली. तर या सायकलिंग पेट्रोलिंग मुळे पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याला तसेच गल्लोगल्ली सायकल गेल्याने नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे रक्षण शतप्रतिशत होणार आहे. तर चोरट्यांवर पेट्रोलिंगचा सकारात्मक परिणाम होणार आहे. सध्या नौपाडा पोलीस ठाण्याचे बिट मार्शल हे दुचाकीवरून पेट्रोलिंग करताना दिसतात. त्यापैकी काही बिट मार्शल हे चार सायकलीवरून पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गल्लोगल्लीपर्यंत पेट्रोलिंग करताना दिसणार आहेत. तर येणाऱ्या काळात पेट्रोलिंग बिट मार्शल हे सायकलीवरून पेट्रोलिंग करताना दृष्टीस पडतील.
"सायकलिंग पेट्रोलिंग" चे अनेक फायदे
नौपाडा पोलीस ठाण्याच्या वतीने सुरु केलेला अभिनव प्रयोग "सायकलिंग पेट्रोलिंग" यामुळे अनेक फायदे आहेत. पोलीस कर्मचारी यांच्या आरोग्याला सदृढ ठेवण्यासाठी सायकल उपयोगी पडणार आहे. तर दुसरीकडे इंधनामध्ये बचत होणार आहे. तसेच सायकल असल्याने पेट्रोलिंग वरील बिट मार्शल हा गल्लोगल्ली जाऊ शकतो. या सायकलिंग पेट्रोलिंग गल्लोगल्ली पोहचणार असल्याने आणि सायकलीचा आवाज होणार नसल्याने गल्लीत दबा धरून बसलेले चोरटे पोलिसांच्या तावडीत सापडतील. चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांवर पेट्रोलिंगची दहशत बसणार आहे. त्यामुळे चोरीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या निमित्ताने अभिनव "सायकलिंग पेट्रोलिंग" प्रयोग आहे. सध्या मनुष्यबळाच्या अभावामुळे केवळ चार सायकली उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून सायकलिंग पेट्रोलिंगआहे. पण भविष्यात जास्तीत जास्त "सायकलिंग पेट्रोलिंग" सुरु करणायचा प्रयत्न आणि मानस राहणार आहे. - रवींद्र क्षीरसागर(वपोनि नौपाडा पोलीस ठाणे)