६५० कोटींच्या विविध विकासकामांचे  भूमीपुजन

पनवेल : ‘जिल्हा नियोजन समिती योजना'च्या माध्यमातून पनवेल महापालिकेला शासनाने यावर्षी २६ कोटी रुपयांचा निधी दिला असून पुढील वर्षीसाठी ३६ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. तसेच १७०० कोटी खर्चुन देशातील सर्वात मोठे ट्रेनिंग सेंटर ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून कळंबोली मध्ये उभारले जाणार आहे. अशा विविध माध्यमातून पनवेल परिसराचा विकास शासन करीत असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कळंबोली येथे केले.

पनवेल मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासह विविध विकासकामांचे भूमीपुजन १४ फेब्रुवारी रोजी कळंबोली, सेक्टर-११ येथील प्लॉट क्रमांक ६/१ येथे करण्यात आला. यावेळी ना. उदय सामंत बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण होते. यावेळी महिला-बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार महेश बालदी, माजी मंत्री राम शिंदे, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार रमेश शेंडगे, महापालिका आयुक्त गणेश देशमुख, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेविक, नगरसेविका, ‘भाजपा'चे पदाधिकारी, पनवेल महापालिकेचे सर्व उपायुक्त, अधिकारी-कर्मचारी आणि कळंबोली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेलमध्ये या विविध विकासकामांच्या भूमीपुजनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ‘पनवेल'च्या विकासाची सुरुवात झाली आहे. पनवेल परिसरातील प्रलंबित प्रश्न शासन सोडवत आहे. येत्या काळात पनवेल महापालिका विकासात्मक दृष्ट्या सदृढ होईल, असा विश्वास ना. रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

नवीन महापालिका असताना मनुष्यबळ कमी असते, यंत्रणा कमी असते. असे असून देखील पनवेल महापालिका वेगाने काम करत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळ होण्याच्या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आपले अस्तित्व निर्माण करीत असल्याचे ना. आदिती तटकरे म्हणाल्या.

‘सबका साथ, सबका विकास...' असे सूत्र पनवेल महापालिकेने स्वीकारले असून महापालिका ग्रामीण भाग आणि शहरी भाग दोन्ही भागामध्ये विकासकामे करताना दिसत आहे. त्याचीच परिणीती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाची उभारणी आहे. याचबरोबर पनवेल मधील पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे कामही या विकास कामांमध्ये होत असून महापालिका आता वेगाने धावत असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन महापालिकेने कामे करण्यास सुरवात केली आहे. राज्य शासनाच्या पाठिब्यांमुळे ‘जीएसटी'चे अनुदान महापालिकेला सुरु झाले असून अमृत २ अंतर्गत मिळालेल्या भरीव निधीच्या माध्यमातून महापालिकने एसटीपी प्लॅन्टची कामे सुरु केली आहेत. त्यामुळे येत्या काळात शंभर टक्के ड्रेनेजची कामे झालेली पनवेल महापालिका महाराष्ट्रातील एकमेव महापालिका असेल, असा विश्वास आयुवत गणेश देशमुख यांनी व्यवत केला.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, सदर कार्यक्रमात ६५० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमीपुजन करण्यात आले. यामध्ये सुमारे ८ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचा समावेश आहे. त्याचबरोबर खारघर आणि कळंबोली मधील नोड मधील विविध रस्त्यांचे काँक्रीटीकरण-पुनर्पृष्ठीकरण, महापालिका मुख्यालय लगतच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण-उन्नतीकरण, पनवेल शहरातील स्वामी नारायण मार्गाचे काँक्रीटीकरण या २३३ कोटी रुपयांच्या कामाचे, अमृत योजना अंतर्गत मलनिःस्सारण वाहिन्या-मल प्रक्रिया केंद्र उभारणे या २५७ कोटी रुपयांचे आणि १४८ कोटी खर्चुन पाणी पुरवठा वितरण व्यवस्था उभारणे, आदि कामांचे डिजीटल पध्दतीने मान्यवरांच्या हस्ते कळ दाबून भूमीपुजन करण्यात आले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'द्वारे एपीएमसी मधील अतिक्रमणाला अभय?