मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
सार्वजनिक ग्रंथालयाच्या दशकपूर्ती सोहळ्यात मान्यवरांची भाषणे
नेरुळ ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा दशकपूर्ती सोहळा संपन्न
नवी मुंबई ः नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक सार्वजनिक ग्रंथालयाचा दशकपूर्ती सोहळा २५ मार्च रोजी ज्येष्ठ नागरिक भवन मधील श्री गणेश सभागृहात प्राध्यापक एल. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखालीी पार पडला. या कार्यक्रमास प्राचार्य अजित मगदूम, प्रा. मारुती मतलापूरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना अजित मगदूम यांनी मराठीतील अभिजात साहित्याचा आढावा घ्ोतला. तसेच जीवनात साहित्याचे महत्त्व किती आहे आणि ते नसल्यास जीवन किती निरस झाले असते याची उदाहरणांसहित सखोल माहिती दिली. झपाट्याने बदलत चाललेले समाज जीवन आणि त्यामुळे हरवत चाललेले संस्कार, जीवनमूल्य याची माहिती देऊन घरातल्या आईची जागा मम्मीने घेतली व तिची मम्मी झाली असे प्रतिपादन एल. बी. पाटील यांनी केले.
ग्रंथालयाचे उपाध्यक्ष रमेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रार्थना, स्वागत गीत, महाराष्ट्र राज्य गीत सादर केले. प्रकाश लखापते यांनी आपल्या प्रास्तविक भाषणात ग्रंथालय करीत असलेल्या कार्याचा आढावा घ्ोतला; कार्याध्यक्ष विकास साठे यांनी सांगितले की, कुठलीही भाषा शुद्ध वा अशुद्ध नसतेच; फार तर आपण तिला प्रमाणभाषा किंवा बोलीभाषा असे म्हणू शकतो. या प्रसंगी प्रवीण पाटील, ललित पाठक, गणेश करमरकर, पांडुरंग क्षेत्रमाडे, गुप्ता झांशीकर, प्रभाकर गुमास्ते, सूर्यकांत कुलकर्णी, रेवाडकर, रणजीत दिक्षित, नंदलाल बॅनर्जी, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती रजनी कलोसे यांनी केले, तर श्रीमती सीमा आगवणे यांनी उपस्थितांचे यथोचित आभार मानले. सर्वश्री दत्ताराम आंब्रे, विजय सावंत, रणजीत दिक्षित, दिलीप जाधव, श्रीमती कल्पना मोहिते, श्रीमती कमल अंगणे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.