अवैधरित्या ड्रेबिज टाकणाऱ्या डंपरवर महापालिका तर्फे फौजदारी कारवाई

पनवेल : पनवेल महापालिका हद्दीतील खारघर सेक्टर-१२ मधील प्रणाम हॉटेल समोरील रोडवर अवैधरित्या ड्रेब्रिज टाकणाऱ्या डंपरला महापालिका डेब्रिज निर्मुल पथकाने जागेवरच पकडले असून, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे महापालिका द्वारे या डंपरच्या चालकावर ४ जानेवारी रोजी  खारघर पोलीस ठाणे मध्ये एफआयआर दाखल करून फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

महिन्यापूर्वी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पनवेल महापालिका हद्दीतील पदपथावर, रस्ते, गार्डन, मोकळे मैदान, भूखंड, बाजार आदी ठिकाणी बांधकाम साहित्य, डेब्रिज, बांधकामाचा राडारोडा आणून टाकणाऱ्या बांधकाम व्यवसायिक, नागरिक, गाडी चालक यांच्यांवर  दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याविषयी सूचित केले होते. त्यानुसार महापालिका हद्दीतील प्रभाग-अ खारघर सेक्टर-१२ येथील प्रणाम हॉटेल समोरील रोडवर ४ जानेवारी रोजी रात्री २ वाजता एक डंपर माती, विटा, दगड, अनधिकृत कचरा, डेब्रिज अवैधरित्या टाकण्याच्या हेतूने आला असता महापालिका डेब्रिज निर्मुलन पथकाने या ट्रकला जागेवरच पकडले. पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेप्रमाणे खारघर अ-प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी खारघर पोलीस ठाणे मध्ये अवैधरित्या ड्रेब्रिज टाकणाऱ्या डंपर चालकाविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका आरोग्य विभागातील स्वच्छता निरीक्षक, सुरक्षा रक्षक, डेब्रिज पथक, अतिक्रमण पथक यांच्या समवेत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांनी  महापालिका अधिनियमानुसार आणि आरोग्य विभागाच्या तरतुदीनूसार कंस्ट्रक्शन अँड डिमॉल्यूशन वेस्ट याप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी, मोकळ्या जागी बांधकाम साहित्य, डेब्रिज, बांधकामाचा राडारोडा टाकल्यास १५ हजार रुपये दंड अथवा फौजदारी कारवाई करावी, असे आदेश दिले आहेत. 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

मुलांना मॉडेल बनविण्याचे स्वप्न दाखवून लुबाडणूक