सायवलोथॅानचा माध्यमातून आरोग्याचा जागर

नवी मुंबईः मूत्रपिॅडाच्या आजाराने प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून किडनी निकामी झाल्यामुळे डायलिसिस होत असलेल्या किंवा प्रत्यारोपणाची नितांत गरज असलेल्या लोकांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी मूत्रपिंडाच्या आरोग्याविषयी जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे असल्याने जागतिक किडनी दिनानिमित्त आणि किडनीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी खारघरच्या मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघर यांनी १० किमी सायक्लोथॉनचे आयोजन केले होते. यात १०० हून अधिक सायकलस्वार सहभागी झाले होते आणि मेडिकवर हॉस्पिटल-सेंट्रल पार्क-मेडिकवर हॉस्पिटल या मार्गावर ही सायक्लोथॉन पार पडली.

डॉ. माताप्रसाद बी गुप्ता, (मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबई येथील केंद्र प्रमुख)आणि पेडल्स फोर कॉज फाऊंडेशनचे संस्थापक साईप्रसाद शेळके यांनी कार्यक्रमाला हिरवा झेंडा दाखवला. सर्व वयोगटातील लोकांमध्ये मूत्रपिंडाच्या समस्यांचे वाढते प्रमाण हे देशातील चिंतेचे कारण ठरत आहे. तरुणांमध्येही किडनीशी संबंधित समस्यांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. चूकीच्या आहाराची निवड, उच्च रक्तदाब, मधुमेह, बैठी जीवनशैली आणि लठ्ठपणाचे वाढते प्रमाण यासारखे घटक या चिंताजनक प्रवृत्तीला कारणीभूत आहेत. परिणामी, एकूण आरोग्यावर आणि जीवनाच्या गुणवत्तेवर किडनीच्या समस्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी वेळीच निदान आणि प्रतिबंध करणे गरजेचे आहे. किडनीचे आरोग्य आणि कल्याण यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्वच वयोगटातील लोकांना लक्ष्य करणाऱ्या जागरुकता मोहिमा आणि शैक्षणिक उपक्रमांची गरज अधोरेखित करते. त्यामुळे मेडिकवर हॉस्पिटल्स, खारघरने किडनीच्या आजाराशी लढा देण्यासाठी एका अनोख्या सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. मेडिकवर हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे कन्सल्टंट युरोलॉजिस्ट आणि ट्रान्सप्लांट सर्जन  डॉ. विकास भिसे सांगतात की, मूत्रपिंडाचा आजार रोखणे हे केवळ वैयक्तिक आरोग्यासाठीच नाही तर संपूर्ण आरोग्य सेवा प्रणालीसाठी महत्त्वाचे ठरते. किडनीच्या आजाराचा मधुमेह, उच्चरक्तदाब आणि हृदयविकार यांसारख्या इतर जुनाट आजारांशी जवळचा संबंध आहे. लठ्ठपणा, धूम्रपान आणि अल्कोहोल यासारख्या जोखीम घटकांना संबोधित करून एखादी व्यक्ती केवळ त्यांच्या मूत्रपिंडांचे संरक्षण करू शकत नाही तर या परस्परसंबंधित आरोग्य समस्या विकसित होण्याची शक्यता देखील कमी करू शकतात. आपल्या मूत्रपिंडाची काळजी घेण्याचा मोलाचा संदेश तसेच एक निरोगी समाज निर्माण करण्याचा सामूहिक प्रयत्न या सायवलोथोनच्या माध्यमातून करण्यात आला. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे'च्या वेळेत लवकरच वाढ