मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
एपीएमसी फळ बाजारात अमेरिकन सफरचंद दाखल
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात परदेशी अमेरिकन सफरचंद दाखल झाली आहेत. अमेरिकन सफरचंद रंगाने गडद गुलाबी असून, चवीला मध्यम गोड आणि खारट आहेत. त्यामुळे या सफरचंदाची बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.
सध्या सफरचंदाचा हंगाम सुरु झाला आहे. बाजारात देशी सफरचंद सोबत आफ्रिका, तुर्कस्तान आणि न्युझीलंड मधील परदेशी सफरचंद देखील आगामी दिवसात एपीएमसी फळ बाजारात दाखल होणार आहेत. एपीएमसी फळ बाजारात देशी सफरचंद ८० ते ११० रुपये तर परदेशी सफरचंद २०० ते २२० रुपये प्रतीकिलो दराने विकले जात आहेत. सफरचंदाची वाढती मागणी पाहता आगामी काळात सफरचंद दर आणखी वाढण्याची शक्यता एपीएमसी फळ बाजारातील फळ व्यापारी अनु सहानी यांनी व्यवत केली.