ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
भाजीपाला मार्केटमध्येही कडक उन्हाचा परिणाम
नवी मुंबई : सध्या पडत असलेल्या कडक उन्हाचा परिणाम भाजीपाला मार्केटमध्येही दिसत आहे. कडक उन्हामुळे अनेक फळभाज्या बाजारातून कमी होताना दिसत आहेत. दुसरीकडे गेल्या आठवड्यातील वांगी दरात काहीशी सुधारणा होत आहे. वांगी दरात कमालीची वाढ झाली आहे. चटणी हंगामामुळे ‘लसूण'ला मागणी वाढल्याने लसूण दरात ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. कोथिंबीरसह अन्य भाज्यांची स्थानिक आवक ठप्प झाल्याने लातूर, कर्नाटक भागांतून बाजार समितीत आवक जास्त आहे.
थंड प्रदेशातील बारमाही गाजराची विक्री वाढली आहे. फळ बाजारात आंबा, कलिंगड वगळता इतर फळांची फारशी आवक नाही. दीड महिना आधीच केसर आंबाही दाखल झाला आहे. आंध्र प्रदेशातून तोतापुरी आंब्याची आवक चांगली आहे. फुल बाजारात मागणीनुसार फुलांना दर मिळत आहे.
नवी मुंबई शहरात जिकडे-तिकडे विक्रीला आंबेच दिसत आहेत. काही मोजक्या विक्रेत्यांकडे कोकणातील देवगड, रत्नागिरी हापूस आंबा विक्रीला आहे. तर ठिकठिकाणी विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात कर्नाटकी हापूस विक्रीला आहे. सध्या कोकणी हापूस आंब्याचा काहीसा तुटवडा असून, कोकणी हापूस आंब्याचे दर चढे आहेत. त्या तुलनेत आवक मोठी असल्याने कर्नाटकातील हापूस आंब्याचे दर कमी आहेत.
भाजीपाला दर प्रतिकिलो रुपये
टोमॅटो - १० ते १५, दोडका - ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली - ४० ते ५०, ढोबळी मिरची - ६० ते ८०, मिरची - ८० ते ९०, पलॉवर - ३० ते ४०, कोबी - १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण - १८० ते २००, आले- १०० ते १२०, लिंबू -३०० ते ६०० शेकडा, गाजर- ३० ते ४०, बीन्स - १२० ते १३०, गवार - ८० ते १००, वरणा शेंगा - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी - ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा - ७० ते ८०, पालेभाजी - १० ते १२.
फुले : झेंडू - ८० ते १००, निशिगंध - ३००, गुलाब - २५० ते २८०, गलांडा - १०० ते १२०, शेवंती - २५० ते ३००.
फळे : सफरचंद -२५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी - ५० ते ८०, डाळिंब - १२० ते २००, चिकू - ६० ते ८०, पेरु - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस - ४० ते ५०, अंजीर-८०-१००.
खाद्यतेल : सरकी - ११० ते ११५, शेंगतेल १७६ ते १८२, सोयाबीन - ११० ते ११५, पामतेल - ११० ते ११६, सूर्यफूल - ११० ते ११५.
कडधान्य : हायब्रीड ज्वारी ३१ ते ३७, बार्शी शाळू ३२ ते ५५, गहू ३२ ते ४०, हरभराडाळ ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ- १२२ ते १३०, हरभरा - ७०, मूग - १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी - ८८, हिरवा वाटाणा - ९०, छोला -१४० ते १६०.