नववर्षाचं जल्लोषात स्वागत !

 

नवी मुंबई : आपल्या देशात वर्षभरात अनेक सण साजरे केले जातात. त्यापैकी गुढीपाडवा हा महाराष्ट्र राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण आहे. गुढीपाडवा प्रामुख्याने महाराष्ट्रात हिंदू नववर्षाची सुरूवात म्हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने  बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सीबीडी सेक्टर – 1, सुनील गावस्कर चौक येथे गुढी उभारून हिंदू नववर्षाची सुरूवात सीबीडी वासीयांसमवेत करण्यात आली. त्याचबरोबर नेरूळ (पश्चिम) व वाशी येथे गुढीपाडवा निमित्त ढोल ताशाच्या गजरात तसेच मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेमध्ये महिला नटून थटून शोभा यात्रेत सहभागी होत नवीन वर्षाची सुरुवात करण्यात आली. 

 गुढीपाडवा म्हणजे नववर्ष आणि दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतिक आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहर्तापैकी एक मानला जाणारा सण  आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून गुढीपाडवा निमित्त सीबीडी येथील सकल हिंदू समाज फाउंडेशन व नेरूळ (पश्चिम) मंडळातर्फे तसेच हिंदू नववर्षे स्वागतयात्रा समिती, वाशी यांच्या वतीने मराठमोळ्या पारंपारिक वेशभूषेतील महिला व पुरुषांनी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात केली. तसेच संपूर्ण महाराष्ट्र गुढीपाडवा सण हा मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होत आहे. त्याचबरोबर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघातील विविध ठिकाणी शोभा यात्रेस भेट देत नागरिकांना “गुढीपाडवा व नव वर्षाच्या” शुभेच्छा दिल्या. 

 आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत माजी नगरसेवक डॉ.जयाजी नाथ, माजी नगरसेविका सरोज पाटील, सुरेखा नरबागे, स्वाती गुरखे, माजी नगरसेवक सुरज पाटील, गिरीश म्हात्रे, राजू तिकोने, सुहासिनी नायडू, देवा म्हात्रे, भास्कर यमगर, हितेश गामी, विनय कोळपकर, संजय ओबेरॉय, संतोष पळसकर, सागर मटकर, क्षितिजा घोरपडे व असंख्य नागरिक उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई आयुक्त डॉ. कैलास शिंदे ॲक्शन मोडवर