तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे महाशिवरात्री उत्सव

डोंबिवली : श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ (ट्रस्ट) नांदिवली पाडा (सागांव), मुरारबाग, एम.आय.डी.सी. (फेज-२) मानपाडा क्रॉस रोड, डोंबिवली (पूर्व) येथे महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. श्री खिडकाळेश्वर मंदिर येथे संजीवन समाधिस्त झालेल्या श्री स्वामी शिवानंद महाराज यांच्या तपश्चर्येने पावन झालेल्या व शंकराचार्यासह अनेक संत महंताच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या तिर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर येथे सालावादप्रमाणे याही वर्षी मंडळाच्या वतीने परमपूज्य १०८ वै. श्री. स्वामी डी. के. दासबाबा, वै.ह.भ.प.सावळाराम महाराज, वै.ह.भ.प. वासुदेव महाराज व वै.ह.भ.प. नानाबुवा चौधरी यांच्या कृपा आशिर्वादाने शुक्रवार व शनिवारी महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात येत आहे. ह्या प्रसंगी शनिवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. तरी सर्व भाविकांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा, तिर्थप्रसादाचा, आरोग्य शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावाअसे आवाहन अध्यक्ष : मोहन नारायण पाटील,उपाध्यक्ष  रतन चांगो म्हात्रे, सचिव पंढरीनाथ मंगल पाटील, सहसचिव अरुण जगन्नाथ पाटील, गजानन आंबो म्हात्रे, सहखजिनदार, रघुनाथ भिवा पाटील,प्रकाश गोविंद म्हात्रे (मा. अध्यक्ष), भानुदास बाळाराम पाटील (मा. सचिव) यांनी केले आहे. संगिताच्या तालावर २४ तास अखंड श्रीराम जय राम जय जय राम, मंत्र जप, श्री सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ आणि किर्तन आयोजित केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ग्रंथालय इमारत उभी राहण्यापूर्वीच खचला पाया