ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
पावसाळा मधील आपत्कालीन परिस्थिती; उल्हासनगर महापालिका सज्ज
उल्हासनगर : पावसाळा जवळ येत असल्याने पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या परिस्थिती बाबत ७ मे रोजी महापालिका आयुवत अजीज शेख यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात बैठक घेण्यात आली.
शहरातील सर्व छोटे-मोठे नाले यांची सार्वजनिक आरोग्य विभाग सर्व स्वच्छता निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक यांनी प्रभाग अधिकारी यांच्या समन्वयाने, नियोजन करुन पावसाळ्यापूर्वी सफाई करणे. तसेच जंतूनाशके खरेदीसाठी लागणारी निविदा प्रक्रिया त्वरित पूर्ण करुन आवश्यक ती जंतुनाशके मागविणे आणि रात्रीचे डोप क्लिनीग प्रभाग अधिकारी यांना सोबत घेऊन नियमीतपणे करण्याचे निर्देश आयुवत अजीज शेख यांनी बैठकीत दिले
वैद्यकीय आरोग्य विभागाने डेंग्यू, मलेरिया, आदि साथरोग नियंत्रणाबाबत आवश्यक ती कार्यवाही सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सहयोगाने पूर्ण करावी. याकरिता औषधे खरेदीसाठी आवश्यक निविदा प्रक्रिया प्राधान्याने त्वरित पूर्ण करावी. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम त्वरित पूर्ण करावे. पावसाळ्यामध्ये पडण्याची शक्यता आहे अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन सदरची झाडे वृक्ष अधिकारी यांनी महापालिका आयुक्त यांच्या मान्यतेने तोडावीत अथवा त्याच्या फांद्या छाटण्यात याव्यात. सर्व प्रभाग समितींच्या सहा. आयुक्तांनी आप-आपल्या कार्यक्षेत्रातील अतिधोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करुन अतिधोकादायक इमारतीला नोटीस बजावून निष्कासनाची कार्यवाही पूर्ण करावी, अशा सूचना आयुवत शेख यांनी यावेळी केल्या.
सदर बैठकीप्रसंगी अतिरिवत आयुक्त जमीर लेंगरेकर, उपायुक्त किशोर गवस, डॉ. सुभाष जाधव, प्रभाग अधिकारी गणेश शिंपी, दत्तात्रय जाधव, अनिल खतुरानी, मनिष हिवरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा, महापालिका सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, सिस्टम ॲनालिस्ट श्रध्दा बाविस्कर, उपलेखा अधिकारी निलम कदम, वाहन-परिवहन प्रमुख विनोद केणे, सार्वजनिक बांधकाम विभाग, उप-अभियंता सेवकानी, दिप्ती पवार, अग्निशमन अधिकारी बाळू नेटके यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.