ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
एपीएमसी बाजारात राजस्थान मधील डाळींब आवक मध्ये वाढ
५० ते १०० रुपये प्रतिकिलो दर
वाशी : अवकाळी पावसामुळे यंदा राज्यातील डाळींब हंगाम एक महिना लांबणीवर गेला असून, डाळींब उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे बाजारात डाळींब फळाची आवक घटली आहे. मात्र, राजस्थान मध्ये डाळींबाचे उत्पादन अधिक झाल्याने वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ मार्केटमध्ये तुलनेने ७० % आवक होत आहे. मात्र, महाराष्ट्रीयन डाळींब पेक्षा राजस्थानी डाळींब फळाला दर कमी मिळत आहे.
वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न समिती फळ बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर, नगर, फटलण, जेजुरी येथून डाळींब दाखल होत आहेत. यंदा पडलेल्या अवकाळी पावसाने डाळींबाच्या बागांना फटका बसला आहे. त्यामुळे राज्यातील डाळींब उत्पादन घटले आहे. मात्र, राजस्थान मध्ये डाळींब उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात राजस्थानी डाळींबाची आवक वाढली असून, डाळींब हंगाम येत्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत राहणार आहे. राज्यातील डाळींबाच्या तुलनेत राजस्थानी डाळींबाची आवक ७० टववयांनी अधिक आहे. उत्तर भारतात थंडी वाढल्याने दिल्ली, कोलकाता आदी भागात डाळींबाच्या मागणीत घट झाली आहे.तर राज्यातील डाळींब आवक घटल्याने बाजारात राजस्थानी डाळींबाच्या मागणीत वाढ होत असल्याने आवक वाढत आहे. मात्र, राज्यातील डाळींब राजस्थानी डाळींबवर भारी पडत असून, आकार आणि चवीला उजवा ठरत आहे. त्यामुळे महाराष्ट्रीयन डाळींब पेक्षा राजस्थानी डाळींब फळाला दर कमी मिळत आहे.
राजस्थानी डाळींब ५० ते १०० रुपये प्रतिकिलो तर राज्यातील डाळींब ७० ते १५० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी हर्षल जेजुरकर यांनी दिली.