आष्टे लॉजिस्टिक कंपनीत ‘कोकण श्रमिक संघ'ची एन्ट्री

कामगारांच्या हक्कासाठी श्रुती म्हात्रे यांचा एल्गार

उरण : गेली अनेक वर्षे आष्टे लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीत काम करणाऱ्या कामगारांना श्रमाचा योग्य मोबदला अर्थात पगारवाढ मिळत नसल्याने सर्व कामगारांनी त्यांचे नेतृत्व करण्याचे अधिकार ‘कोकण श्रमिक संघ'ला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने आष्टे लॉजिस्टिक येथील भूमीपुत्र कामगारांवर कंपनी व्यवस्थापनाकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता तसेच न्याय मिळवून देण्यासाठी ‘कोकण श्रमिक संघ'च्या कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली कंपनीच्या आवारात संघटनेच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

आष्टी लॉजिस्टिक कंपनीने कामगारांच्या जमिनी घेऊन त्यांना कमी पगारावर कामावर ठेऊन घेतले होते. मात्र, याठिकाणी सदर कामगारांना दहा वर्षाहून अधिक काळ झाल्याने कंपनीला वारंवार पगारवाढीबाबत विचारणा करुन देखील पगारवाढ होत नव्हती. त्यामुळे अन्याय दूर होण्यासाठी बहुसंख्य कामगारांनी ‘कोकण श्रमिक संघ'ला आपले नेतृत्व करण्याचा अधिकार दिले आहेत. त्यानुसार २७ रोजी आष्टे लॉजिस्टिक प्रा.लि. कंपनीसमोर ‘कोकण श्रमिक संघ'च्या नामफलकाचे अनावरण कामगार नेत्या श्रृती शाम म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

कामगारांवरील अन्यायाविरोधात युनियन नसली तरी सुध्दा मी कामगारांच्या पाठीशी कायम उभी राहणार आहे. तसेच कामगारांना योग्य न्याय मिळवुन देणार असा विश्वास व्यक्त करत श्रुती म्हात्रे यांनी आमच्या भुमीपुत्रांचा हक्क आम्ही कोणत्याही परिस्थितीत घेऊन राहु असा इशारा देखील आष्टे लॉजिस्टिक कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला.
याप्रसंगी कामगार नेते नाना म्हात्रे, वसंत काठावले, ‘कोकण श्रमिक संघ'चे एकनाथ ठोंबरे, माथेरान युनिट अध्यक्षा ॲड. प्रिया वहालकर-शिंदे, माथेरानचे माजी नगरसेवक दिनेश सुतार, नरहरी घरत, भगवान घरत, परेश घरत, सचिन पाटील, रेवनाथ पाटील, लायन्स ग्रुप अध्यक्ष बाळुशेठ फडके, उपाध्यक्ष रविशेठ शेळके, आकाश पाटील, संदीप पाटील, सुरेश नाईक, संजय घरत, नितीन पाटील, उत्तम भोईर, देवेंद्र पाटील, स्थानिक सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि परिसरातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच बहुसंख्य महिला यावेळी आवर्जुन उपस्थित होत्या. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिघा-ऐरोली विभागात ‘विकसित भारत संकल्प यात्रा' संपन्न