डीपीएस पलेमिंगो तलावावरील सीआरझेड-१ क्षेत्रावर ६०० मीटरचा बंधारा

नवी मुंबई : डीपीएस तलावाला लागून सीआरझेड-१ क्षेत्रावरील ६०० मीटर बेकायदेशीर बंधाऱ्याबाबत पर्यावरणवाद्यांच्या तक्रारीला उत्तर देताना केंद्राने ‘महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरण'ला (एमसीझेडएमए) चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत.

‘नॅटकवट फाऊंडेशन'च्या तक्रारीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेली ‘खारफुटी समिती'ही डीपीएस तलाव स्थळाला भेट देणार आहे. बंधारा आता तलावातील भरतीच्या पाण्याचा प्रवाह रोखणारा कच्चा रस्ता बनला आहे. शिवाय बंधारा एका बाजुला खारफुटीतून आणि दुसरीकडे पाणथळ जमीन कापतो, जे सीआरझेड-१ नियमांचे स्पष्ट उल्लंघन आहे, असे ‘नॅटकनेवट फाऊंडेशन'चे संचालक बी. एन. कुमार यांनी सांगितले.

‘केंद्रिय पर्यावरण, वने-वातावरणीय बदल मंत्रालय'ने (एम.ओ.ई.एफ.सी.सी.) ‘महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट ॲथॉरिटी ‘एमसीझेडएमए'ला तक्रारीची सत्यता तपासून अहवाल देण्यास सांगितले आहे. ‘एमओईएफसीसी'चे अधिकारी टी. के. सिंग यांनी त्यांच्या मेलमध्ये म्हटले आहे की, एमसीझेडएमए अशा समस्या तपासण्यासाठी पुरेशी सक्षम आहे. 

दरम्यान, ‘मॅन्ग्रोव्ह समिती'ने ‘नॅटकनेवट'च्या तक्रारीची दखल  त २९ मे रोजी डीपीएस तलाव स्थळाची तपासणी करण्यास सांगितले. ११९१च्या सीआरझेड अधिसुचनेव्यतिरिक्त सदर बंधाऱ्याने सप्टेंबर २०१८ रोजीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाचा भंग केला आहे. या मोठ्या उल्लंघनासाठी सिडको या क्षेत्राची जमीनदार असल्याने साहजिकच जबाबदार आहे. सदरचा कच्चा रस्ता ३० एकर डिपीएस पलेमिंगो तलावात भरतीच्या पाण्याचा मुक्त प्रवाह रोखतो, असे बी. एन. कुमार यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे.

सदर भागातील खारफुटी अद्याप वन विभागाच्या ताब्यात येणे बाकी असल्याचे आहे. ‘नॅटकनेवट'ने ‘सिडको'ला परिसरातून चिखल आणि माती काढून भरतीच्या पाण्याच्या मुक्त प्रवाहासाठी मार्ग मोकळा करण्याचे आदेश देण्यासाठी सरकारला तात्काळ हस्तक्षेपाची विनंती केली आहे. ‘नॅटकनेवट'च्या विनंतीला पाठिंबा देत, ‘सागरशवती'चे प्रमुख नंदकुमार पवार यांनी आता अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट केले.

नॅटकनेक्ट तसेच नवी मुंबई एन्व्हायर्नमेंटल प्रिझर्व्हेशन सोसायटी, सेव्ह पलेमिंगो अँड मँग्रोव्हज, पारसिक ग्रीन्स आणि खारघर हिल आणि वेटलँड या हरित गटांनी डीपीएस पलेमिंगो तलावाच्या पाण्याचा प्रवाह वाचवण्याची मोहीम आधीच सुरु केली आहे. अलिकडेच डीपीएस पलेमिंगो तलाव येथे १० पेक्षा जास्त पलेमिंगो मरण पावले असून अनेक गुलाबी पाहुणे जखमी झाले आहेत. सदर प्रकार पलेमिंगो पक्षी कोरड्या तलावामुळे विचलित झाल्याने घडले असल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले.

फेब्रुवारी १९९१ नंतर (जेव्हा सीआरझेड अधिसूचना जारी करण्यात आली होती) गुगल अर्थ नकाशांवर एक नजर टाकल्यास स्पष्टपणे दिसून येते की, सदर विशिष्ट ठिकाणी रस्ता नव्हता. याउलट ते दाट झाडे दाखवते ती खारफुटींशिवाय दुसरे काहीही असू शकत नाही, असे तक्रारीत नमूद केले आहे.
-बी. एन. कुमार, संचालक-नॅटकनेवट फाऊंडेशन.

कच्च्या रस्त्याने पाण्याच्या प्रवाहासाठी जी ३ व्यवस्था केली आहे ती देखील आता ब्लॉक झाली आहेत.याचा परिणाम म्हणजे डीपीएस पलेमिंगो तलावातील पाण्याचा प्रवाह वारंवार रोखला जातो. -नंदकुमार पवार, प्रमुख-सागरशवती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संध्याकाळपासून पहाटे 5 पर्यंत धडक कारवाई