पलावा चौकात दहावे ‘आश्चर्य'

डोंबिवली : वाहतुकीच्या कोंडीत अडकलेल्या प्रवाशांची सुटका व्हावी, प्रवास सुखकर व्हावा म्हणून उड्डाणपुल आणि इतर दर्जेदार चोख व्यवस्था प्रशासन करत असते. पण, अशी कामे होत असताना मार्जितल्या माणसांना जपले जात आहे, अशीच परिस्थिती वर्दळीच्या शिळफाटा रस्त्यावरील पलावा चौकातील उड्डाणपुलाबाबत झाली आहे. बेकायदेशीर बांधकाम वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. परिणामी, विकास काम संथ आणि ठप्प होत आहे. यावर लक्ष केंद्रित व्हावे म्हणूनच ‘मनसे'चे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद (राज) पाटील यांनी पलावा चौकात दहावे आश्चर्य असे एक्स द्वारे (ट्‌वीट) केले आहे.

मुंबई, नवी मुंबई, पुणे, कोकण, ठाणे येथील रोडमार्गे डोंबिवली-कल्याण येथे येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांसाठी कल्याण-शीळ असा एकच महत्वाचा रस्ता आहे. याच रस्त्यावर पलावा चौक म्हणजे रोजच्या वाहतूक कोंडीचे ठिकाण झाले आहे. बाहेरगावाहून येणारी वाहने वाहतूक कोंडीमुळे त्रस्त होत आहेत. कोंडीमुळे तासन्‌तास वाया जात असून माणसे बेजार होत आहेत. ती माणसेही या वाहतूक कोंडीला कंटाळली आहेत.

पलावा चौकात उड्डाणपुल लवकर व्हावा म्हणून आमदार पाटील यांनी सरकार दरबारी प्रयत्न केले होते. त्यासाठी पाठपुरावाही केला. परंतु, काही कारणे जाणूनबुजून पुढे करुन या पुलाच्या कामात अडथळे आणले गेले. सदर पुलाबाबत राजू पाटील यांच्या मते जसे मुंबईत दादर येथील टिळक पुलाचे काम करताना बांधकाम अधिकाऱ्यांनी पुलाचा एक सांधा जोड या भागातील एका जुन्या घराच्या खांबाला आणून जोडला आहे. अशाप्रकारे काम करुन अधिकाऱ्यांनी जगातील नववे आश्चर्य मुंबईत निर्माण केले आहे. हीच बाब पुढे करीत आमदार राजू पाटील यांनी पलावा चौकात मग दहावे आश्चर्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करुन दाखविले आहे, असे आ. राजू पाटील यांनी टि्‌वट मध्ये म्हटले आहे.

पलावा चौकातील बेकायदा बांधकाम वाचविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी शिळफाटा रस्त्याच्या पलावा चौक भागातील आराखडा बदलून पुलाची उभारणी होत आहे. पुलाच्या खांबाचा एक सांधा रस्त्यालगतच्या बेकायदा बांधकामाला लागणार आहे. पुढे भविष्यात पुलावर कधी अपघात घडला, तेथील बांधकामही कारणीभूत ठरेल, अशी भिती आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच तज्ञांनी पलावा चौकाला भेट द्यावी आणि जगातील बांधकामाचे दहावे आश्चर्य पाहिल्याचे समाधान मानावे, असेही आमदार राजू पाटील यांनी टि्‌वट द्वारे पटवून सांगितले आहे. 

 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

‘नमो संवाद कॉर्नर सभा' संदर्भात बैठक संपन्न