१५ कारखान्यांना मालमत्ता जप्तीची नोटीस
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेने मालमत्ता कर भरण्यास सांगूनही न भरल्याने प्रशासनाने डोंबिवली मधील सुमारे १५ कारखान्यांना २१ फेब्रुवारीपासून जप्तीच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातील प्रत्येक कारखान्याचा मालमत्ता कर थकबाकी सुमारे १५ लाखापर्यत आहे. महापालिका कडून नोटीस मिळताच कारखानदारांनी ‘कल्याण-अंबरनाथ मॅन्युफॅक्चर असोसिएशन'ने (कामा संघटना) याची माहिती दिली. जप्तीच्या नोटीसांबाबत जाब विचारण्यासाठी महापालिकेच्या कल्याण येथील मुख्यालयात कारखानदार ‘कामा संघटना'च्या झेंड्याखाली मोर्चा काढणार आहेत.
महापालिका मालमता कर विभागाकडून डोंबिवली मधील कारखान्यांना २१ फेब्रुवारी रोजी अखेरची सूचना देणारी जप्तीची नोटीस बजावण्यात आली आहे. वेळोवेळी कराचे बिल पाठवले असून जप्तीची वॉरट पूर्व अखेरची सूचना बजावण्यात आली आहे. मात्र, संबंधित कारखान्यांनी अजूनही मालमत्ता कराची रक्कम भरली नाही. ते कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आपल्या विरुध्द अधिनियमातील प्रकरण ८, कारानियमातील नियम ४२ आणि ४४ अन्वये जप्तीचा वॉरंट काढण्यात येत आहे. जप्तीचा वॉरट काढल्यानंतर मालमता करात वॉरट फी (५ टक्के) रक्कम आणि वॉरंट बजावणी फी (१० टक्के) रक्कमांची आकारणी करुन जंगम अथवा स्थावर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करणात येईल. तसेच जप्तीची वॉरट बजावल्यानंतर देखील कराची थकबाकी रक्कम आणि वॉरंट फी जमा न केल्यास अधिनियमातील नियम ४७ नुसार स्थावर अथवा जंगम मालमत्ता अटकावणी किंवा जप्तीची कारवाई करून जाहीर लिलावाने विक्री करुन मालमत्ता कराची रक्कम वसूल करण्यात येईल. जप्तीची नोटीस मिळाल्यापासून ७२ तासाच्या आत महापालिकेकडे कराची रक्कम भरावी आणि तसे केल्यास महापालिका कडून जप्तीची कारवाई केली जाईल, असे सदर नोटिसीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
जप्तीच्या सदर नोटिसांबाबत ‘कामा संघटना'च्या पदाधिकारी बैठक घेऊन यावर चर्चा करतील. २००२ च्या आधीचा जो आकाराला जात होता, तोच कर आकारण्यात यावा यावर महापालिका महासभेत चर्चा करुन ठराव केला आहे. कामा संघटनेने डिसेंबर २०२० ला मालमत्ता कर बिलाच्या दुरुस्तीबाबत महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘ संघटना'च्या पदाधिकाऱ्यांना संबधित विभागाकडून सोपटवेअर अपडेट करुन मालमत्ता कर बिलाच्या दुरुस्ती करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. असे असताना महापालिका प्रशासन कारखानदरांना जप्तीची नोटीस बजावते. याबाबत कामा संघटना महापालिका मुख्यालयात कारखानदारांना घेऊन मोर्चा काढणार आहे.
डॉ. देवेन सोनी, कार्यकरी अध्यक्ष-कामा संघटना.