नेरुळ मध्ये महिला मेळावा संपन्न

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत संकल्प यात्रा'च्या संकल्पनेने देशातील करोडो महिलांना जोडून घेण्याकरिता ‘भाजपा'च्या वतीने ‘नारी शक्ती वंदन' अभियान हाती घेण्यात आले आहे. याच अनुषंगाने ‘बेलापूर'मध्ये आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून नेरुळ,सेवटर-१२ मधील तेरणा हायस्कूल मैदान येथे ‘जागतिक महिला दिन'चे औचित्य साधून आयोजित ‘महिला मेळावा'चे उद्‌घाटन माजी खासदार तथा ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक प्रमुख विनय सहस्त्रबुद्धे यांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन झाले. यावेळी उपस्थित हजारो महिलांना पंतप्रधान मोदी यांचे ‘नारी शक्ती वंदन'चे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. 

‘महिला सक्षमीकरण'साठी भाजप एकमेव पर्याय आहे. महाराष्ट्राला राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. आनंदीबाई जोशी, रमाबाई रानडे, अशा कणखर आणि सक्षम महिला नेतृत्त्वाची परंपरा आहे. राजकारण, साहित्य, संगीत, कला, अर्थशास्त्र, विज्ञान, अशा सगळ्याच क्षेत्रांमध्ये महिलांनी मोठी कामगिरी केली आहे. महिला शक्तीच या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे नेईल. त्या विचारातूनच सदर महिला मेळावा आयोजित करण्यात आला. ‘महिला सक्षमीकरण'साठी मी आणि भाजप पक्ष नेहमीच कार्यरत असतो, अशी भावना आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. देशात लोकसभा आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देत त्यांना राजकारणात आणि पर्यायाने समाजात सक्षम करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘भाजपा सरकार'ने घेतला. महिलांसाठी असे धडाडीचे निर्णय फक्त ‘भाजपा'च घेऊ शकते. त्यामुळे ‘महिला सक्षमीकरण'साठी भाजप हाच एकमेव पर्याय आहे, असे विनय सहस्त्रबुध्दे यांनी सांगितले.

आ. सौ. मंदाताई म्हात्रे नेहमीच आपल्या धडाकेबाज निर्णयशैलीसाठी ओळखल्या जातात. त्यांनी मतदारसंघात केलेली कामे खरेच थक्क करणारी आहेत. नवी मुंबईला मंदाताई म्हात्रे यांच्या रुपाने पोलादी नेतृत्त्व लाभले असल्याचेही सहस्त्रबुध्दे म्हणाले.

आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्याकडून बेलापूर विधानसभा क्षेत्रात होत असलेल्या विकास कामांची प्रचिती पाहता विनय सहस्त्रबुध्दे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेरुळ येथील ‘काँग्रेस'च्या माजी नगरसेविका सुनिता शेट्टी यांच्यासह तसेच सीबीडी येथील अमृता पवार, पुष्पा राठोड यांच्यासह असंख्य महिलांनी ‘भाजपा'मध्ये जाहीर प्रवेश केला. तसेच सामाजात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. 

याप्रसंगी माजी महापौर सुषमा दंडे, माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, दिपक पवार, सुनील पाटील, काशिनाथ पाटील, माजी नगरसेविका सरस्वती पाटील, शिल्पा कांबळी, डॉ. राजेश पाटील, राजू तिकोने, विजय घाटे, पांडुरंग आमले, दत्ता घंगाळे, फुलन शिंदे, जयश्री चित्रे, सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, उल्का तिकोने, कविता जाधव, शारदा आमले, आरती राऊळ, ज्योती पाटील, तेजस्वी म्हात्रे, शीतल जगदाळे, डॉ. वनिता राजे, सुधा राणी जैन, वनिता गडदे, उज्ज्वला बेल्हेकर, जयश्री विजयकुमार, सतीश निकम, विकास सोरटे, प्रताप भोसकर, देवा म्हात्रे, मकरंद म्हात्रे, चंद्रशेखर भोपी, प्रतिक पाटील, कुंदन म्हात्रे, सुजित कोळी, संजय ओबेरॉय, चिंतामण बेल्हेकर, चंदकांत कोळी, गंगेश कोळी यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि हजारो महिला उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमुळे वायु प्रदुषण होत असल्याची तक्रार